Posts

Showing posts from March, 2026

भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा अॅडव्हायझरी जारी ! हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

यवतमाळ, दि. 4 (जिमाका) : केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या मार्गदशक सुचनेनुसार मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा अॅडव्हायझरी जारी केली आहे. त्या अनुषंगाने पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद) कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशातील भारतीय दूतावासांच्या 24X7 हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, दूतावास नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक सूचना जारी करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने परदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय...

कौशल्य विकास धोरणाबाबत सुचना, हरकती कळविण्याचे आवाहन धोरण

Image
यवतमाळ, दि. 4 (जिमाका) : राज्याचे कौशल्य विषयक धोरण तयार करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने दि. 13 जुन 2024 च्या शासन निर्णयान्वये मा. आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. कौशल्य विकास धोरणाची एकंदरीत व्याप्ती विचारात घेता या कामकाजासाठी तात्पुरत्या स्वरुपात संबंधित विषयाचे विशेषज्ञ म्हणून एम/एस केपीएमजी ॲडव्हिसरी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधितानी कौशल्य धोरणाचा सुधारित प्रारूप मसुदा सादर केला आहे. दि. 24 फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या नियामक समितीच्या बैठकीत मा. अपर मुख्य सचिव यांनी दिलेल्या सूचना विचारात घेवून धोरणाचा प्रारूप मसुदा महास्वयम पोर्टलवर नोटीस सेक्शनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्याच्या कौशल्य विषयक धोरणाबाबत आपल्या सूचना, अभिप्राय, हरकती, सुधारणा इ. दि.6 मार्च पर्यंत विहित नमुन्यात लेखी स्वरुपात mhskillpolicy@mssds.in या इमेल आयडीवर कळविण्यात याव्यात. त्याअनुषंगाने कौशल्य धोरणाचा प्रारूप मसुदा महास्वयम पोर्टलवर नोटीस सेक्शनमध्ये उपलब्ध करून द...