यवतमाळ महोत्सवाचा दिमाखात समारोप
इंडियन आयडॉल फेम अभिजित सावंत यांच्या गाण्यांनी जिंकली प्रेक्षकांची मनं महोत्सवातील विविध प्रदर्शनीतून सुमारे अडीच कोटींची उलाढाल सांस्कृतिक कार्यक्रमाला भरगच्च गर्दी यवतमाळ, दि.३१ (जिमाका) : राज्य शासनाच्या विविध जिल्हास्तरीय विभागांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'यवतमाळ महोत्सव २०२६' दिमाखात समारोप करण्यात आला. या महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात इंडियन आयडॉल फेम प्रसिद्ध गायक अभिजित सावंत यांच्या गीतगायनाने रंगत आणली. या कार्यक्रमाला नगराध्यक्षा ॲड प्रियदर्शनी उईके, जिल्हाधिकारी विकास मीना, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कविता महाजन, तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, मुख्याधिकारी शुभम क्यातमवार आदी मान्यवर उपस्थित होते. या यवतमाळ महोत्सवात भरविण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनी, उमेदच्या समृद्धी मिनी सरस प्रदर्शनी आणि माविमच्या नवतेजस्विनी प्रदर्शनीत कालपर्यंत जवळपास अडीच कोटी रुपयांची उ...