ग्रंथालय हे समाज, संस्कृती आणि ज्ञानाच्या प्रसाराचे केंद्र

पालकमंत्री ना.संजय राठोड यांचे प्रतिपादन यवतमाळ, दि. 25 (जिमाका) : आजच्या डिजिटल युगात ग्रंथालयाचे महत्व अबाधित आहे. ग्रंथालये ही एक चळवळ असून ते समाज, संस्कृती आणि ज्ञानाच्या प्रसाराचे केंद्र आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी केले. ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय व अशोक सार्वजनिक वाचनालय वाघापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा ग्रंथालय संघ यवतमाळच्या एक दिवसीय वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन पालकमंत्री ना. राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ गजानन कोटेवार, बाळासाहेब धांदे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कविता महाजन, प्रभाकर भोगे, जिल्हाध्यक्ष राजेश चव्हाण, सचिव प्रशांत पंचभाई, संजय कोल्हे, विनोद देशपांडे, मनोज रणखांब, अशोक फुटाणे यांच्यासह सर्व पदाधिकारी व ग्रंथप्रेमी उपस्थित होते. पालकमंत्री ना. संजय राठोड पुढे म्हणाले, ग्रंथालये ही काळाची गरज आहे. ग्रंथालयांच्या माध्यमातून समाज उभारणीचे काम होत आहे. ग्रंथालये आणि त्यातील पायाभूत सुविधा व कर्मचाऱ्यांच्या मागण्या व समस्या सोडविण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. त्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करत आहे. तसेच ग्रंथालयांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, वाचनालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांची जोड दिल्यास भावी पिढीला उपयुक ठरेल. असे सांगून ग्रंथालयाचे प्रश्न हे समाजव्हे प्रश्न आहेत ही भूमिका ठेऊन त्या सोडविण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव प्रशांत पंचभाई यांनी करून ग्रंथालयाच्या मागण्या व समस्या मांडल्या.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती