वन शहीद विजय सिंगणजुडे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री यांच्याकडून शोकसंवेदना
यवतमाळच्या हिवरी वनपरिक्षेत्रात लागलेली आग विझवण्याच्या धाडसी प्रयत्नात गंभीर जखमी झालेले वनपाल विजय सिंगणजुडे यांचे निधन झाले, ही अत्यंत दुःखद बातमी आहे. आपल्या जंगलांचे आणि नैसर्गिक संपदेचे रक्षण करताना जीवाची बाजी लावणारे ते खरे वन शहीद आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे.
वन शहीद विजय सिंगणजुडे यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करुन राज्य त्यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेला सदैव कृतज्ञतेने स्मरणात ठेवेल, असेही मुख्यमंत्री यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
Comments
Post a Comment