महिला सक्षमीकरण योजनांची जनजागृती करा

जिल्हाधिकारी विकास मीना यांचे निर्देश 'बेटी बचाव-बेटी पढाओ' अंतर्गत जिल्हास्तरीय कृती दलाची आढावा बैठक यवतमाळ, दि.१८ (जिमाका) : मुलींच्या जन्माबाबत समाजात सकारात्मकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या 'बेटी बचाव-बेटी पढाओ' अभियानासाठीच्या जिल्हास्तरीय कृती दलाची आढावा बैठक जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विशाल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) युवराज म्हेत्रे, बाल कल्याण समितिचे अध्यक्ष वासुदेव डायरे व जिल्हा परिवीक्षा अधिकारी विनोद पाटील संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतला आणि काही महत्त्वपूर्ण निर्देश दिले. महिला सक्षमीकरणाचा संदेश घराघरांत पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पथनाट्ये तयार करून त्यांचे सादरीकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी वृक्षारोपण मोहीम राबवून आणि मुलींच्या जन्माबाबत जनजागृती करून समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात यावा. यासोबत, जिल्हाधिकारी विकास मीना यांनी महिला व बालविकास विभाग तसेच इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या महिलाविषयक योजनांचा आढावा घेतला. जिल्हयात सध्या सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत महिला सक्षमीकरणाच्या योजनांची जनजागृती प्रभावीपणे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या. 000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती