Posts

Showing posts from August, 2026

कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे यांचा जिल्हा दौरा

  यवतमाळ, दि.३१ (जिमाका) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) अॅड. निलेश हेलोंडे पाटील हे बुधवारी, २ सप्टेंबर   रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.   त्यांच्या दौऱ्यानुसार दुपारी ३.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली मिशनसंबंधित जिल्हास्तरीय आढावा बैठकीला उपस्थित राहणार असून या बैठकीत विविध विषयांची आढावा घेणार आहेत.

जिल्हास्तरीय प्राणीक्लेष प्रतिबंधक समितीत नवीन अशासकीय सदस्यांची नियुक्ती होणार

  इच्छुकांनी ७ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन   यवतमाळ, दि. 31 (जिमाका) :   जिल्हास्तरीय प्राणीक्लेष प्रतिबंधक समितीचसाठी नव्या अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, यासाठी पात्र व इच्छुक व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.    जिल्हास्तरीय प्राणीक्लेष प्रतिबंधक समितीमध्ये एकूण ११ अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये नोंदणीकृत गोशाळा किंवा पांजरापोळ संस्थांपैकी एका संस्थेचा अध्यक्ष एक सदस्य म्हणून, प्राण्यांच्या कल्याणविषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे दोन सदस्य, सर्वसाधारण समितीने नामनिर्देशित केलेल्या दोन व्यक्ती तसेच जिल्ह्यात मानवहिताचे कार्य करणारे, प्राण्यांवर प्रेम करणारे अथवा प्राणी कल्याणासाठी कार्य करणारे सहा कार्यकर्ते यांचा सदस्य म्हणून समावेश राहणार आहे. यासंदर्भातील विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालय, हनुमान आखाडा जवळ, चांदणी चौक, यवतमाळ येथे उपलब्ध असून प्राण्यांविषयी सेवाभावी वृत्ती असलेल्या तसेच गोशाळा किंवा पांजरापोळ संस्थांशी संबंधित कार्य करणाऱ्या इच्छुक व्यक्तीं...

समाधान समारोहअंतर्गत विशेष लोकअदालतमध्ये सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित ४९ प्रकरणांत यशस्वी तडजोड

  व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे निपटारा यवतमाळ, दि. 31 (जिमाका) : नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालय येथून २१ व २३ ऑगस्ट रोजी विशेष लोकअदालत आयोजित करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल. यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान समारोह २०२६ अंतर्गत आयोजित विशेष लोकअदालतीमध्ये थेट व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या जिल्ह्यातील तब्बल ४९ प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड करण्यात आली. य विशेष लोकअदालतीसाठी नागपूर खंडपीठातील उच्च न्यायालय विधी सेवा उपसमितीकडून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळकडे सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित प्राप्त प्रकरणांची तालुकानिहाय छाननी करुन ती संबंधित तालुका विधी सेवा समित्यांकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतर पक्षकार, अधिवक्ते आणि संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींच्या समन्वयाने पूर्व-लोकअदालत बैठका घेण्यात आल्या. या प्रक्रियेदरम्यान पुसद तालुका विधी सेवा समितीमार्फत महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड,...

‘एसआयआर’ची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध ; जिल्ह्यात १९.८८ लाख मतदार

  > दावे व हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत                                           > ४ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार             यवतमाळ, दि. ३१ (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व सात विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी आज, दि. ३१ ऑगस्ट रोजी संबंधित मतदान केंद्रांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.            या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये पुरुष, महिला व तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. मतदारसंघनिहाय तपशील संबंधित मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिक, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच संबंधित सर्व घटक...

7 सप्टेंबर रोजी लोकशाही दिन

  यवतमाळ, दि. 27 (जिमाका) : जनतेच्या तक्रारी व समस्या सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येते. त्यानुसार सप्टेंबर महिन्याचा जिल्हा लोकशाही दिन दि. 7 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता   बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा लोकशाही दिनामध्ये न्याय प्रविष्ट प्रकरणे, राजस्व अपिल प्रकरणे, सेवा, आस्थापना विषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे असे पत्र स्वीकारण्यात येणार नाही. वैयक्तिक स्वरुपाची तक्रार, निवेदन सादर करुन नये. महिन्यातील तिसऱ्या सोमवारी तालुका स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये अर्जाचे निराकरण न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज सादर करावा. तसेच अर्ज दाखल करतेवेळी तालुका स्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल केल्याची पोच जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये सादर करावी. याशिवाय संबंधित अर्ज स्विकारले जाणार नाही, यांची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुध्द बक्षी यांनी केले आहे

गाव ते जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’; रुग्णालयनिहाय सेवा निश्चित

  आरोग्य विभागाचा महत्वपूर्ण निर्णय                                       सार्वजनिक आरोग्य सेवेत पारदर्शक, विश्वासार्हता वाढणार   -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर              यवतमाळ, दि. 27   (जिमाका) : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने रुग्णालयनिहाय आरोग्यसेवांचे सर्वसमावेशक मानक निश्चित केले आहेत. ग्रामीण रुग्णालयापासून ३०, ५०, १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयापर्यंत कोणत्या स्तरावर कोणते तज्ज्ञ डॉक्टर, सुश्रुषा सेवा, कुशल मनुष्यबळ, प्रयोगशाळा व रेडिओलॉजी सेवा, औषधे आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध असाव्यात, याची स्पष्टता शासन निर्णयातून करण्यात आली आहे.              आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ...

बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

               यवतमाळ दि.27 (जिमाका) :   मुंबई उच्च न्यायालयातील महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सामाईक न्यूनतम कार्यक्रमांतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि राणी लक्ष्मीबाई विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायदा, २०१२ या विषयावर कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.             राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल. यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, यवतमाळ दीपक एच. दाभाडे यांच्या पुढाकाराने २४ ऑगस्ट रोजी राणी लक्ष्मीबाई विद्यालयात हा   शिबिर घेण्यात आला.              कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राणी लक्ष्मीबाई विद्यालय...

खैरगाव येथे शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची ३० वी सभा उत्साहात

Image
  प्रगतशील शेतकऱ्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण ; एकात्मिक शेती पद्धतीची प्रत्यक्ष पाहणी यवतमाळ, दि. 27 (जिमाका) :   कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची ३० वी सभा पांढरकवडा तालुक्यातील खैरगाव येथे प्रगतशील शेतकरी कृष्णाभाऊ देशेट्टीवार यांच्या शेतावर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सभेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, उपविभागीय कृषी अधिकारी सी.जे.निंघोट, मंचाचे अध्यक्ष जगदीश चव्हाण, उपाध्यक्ष बाबासाहेब कपिले यांच्यासह मंचाचे १५ सदस्य उपस्थित होते. यावेळी नुकताच उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कृष्णा देशेट्टीवार तसेच वसंतराव नाईक प्रतिष्ठान पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अशोक वानखेडे यांचा शेतकरी शास्त्रज्ञ मंचातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे महत्त्व अधोरेखित केले.  “ शेतकरी शास्त्रज्ञ मंच ही यवतमाळ जिल्ह्याच्या शेतीची ओळख आहे, ”  असे प्रतिपादन त्यांनी केले. मंचाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी एकत्...

स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज नुतनीकरणाची संधी

  १५ सप्टेंबरपर्यंत मुदत यवतमाळ, दि. 27 (जिमाका) :   शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जाचे नुतनीकरण करण्यासाठी संधी दकेण्यात आली असून त्यासाठी संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. हे संकेतस्थळ सन २०२५-२६ मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नुतनीकरण अर्ज भरलेले होते व सदर अर्ज समाज कल्याण विभागाकडून मंजूर     झाले आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आले आहे. समाज कल्याण विभागाकडून अर्ज नुतनीकरणासाठी महत्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना     शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये अर्जाचे नुतनीकरण करण्यासाठी   http://hmasnew.mahait.org   या संकेतस्थळावर १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत संबंधित विद्यार्थ्यांनी आपला अर्ज नुतनीकरण करणे आवश्यक आहे. अर्ज नुतनीकरण करताना विद्यार्थ्यांना कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास त्यांनी अंतिम मुदतीपूर्वी, म्हणजेच १५ सप्टेंबरपूर्वी, संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. अ...

अग्निप्रतिबंधक उपाययोजना तात्काळ पूर्ण करा

  शासकीय, खाजगी आस्थापनांना जिल्हा प्रशासनाचे निर्देश   यवतमाळ, दि. 27 (जिमाका) :   जिल्ह्यात आग लागण्याच्या घटनांमध्ये जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ आणि प्रभावी प्रतिसाद सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग, रुग्णालये, दुकाने, मॉल, औद्यागिक संस्था व   खासगी आस्थापनांना आवश्यक अग्निप्रतिबंधक उपाययोजना तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीवसंरक्षण उपाययोजना अधिनियम, २००६, त्याअंतर्गत नियम २००९ तसेच २०२३ मधील सुधारित तरतुदींनुसार शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, खाजगी कोचिंग संस्था, वसतिगृहे, प्रशिक्षण केंद्रे, रुग्णालये, व्यापारी संकुले, मॉल, दुकाने, औद्योगिक आस्थापने आणि इतर सार्वजनिक वापराच्या इमारतींमध्ये आवश्यक अग्निसुरक्षा उपाययोजना राबविणे बंधनकारक असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सर्व संबंधित आस्थापनांनी त्यांच्यास इमारतीच्या स्वरूप व जोखीमी च्या प्रमाणानुसार आवश्यक क्षमतकची व मान्यताप्राप्त अग्निशामक यंत्रे, अग...

ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेतील कला प्रकाराबाबत आक्षेप, पुरावे दाखल करण्याचे आवाहन

  > ५ सप्टेंबरपर्यंत मुदत             यवतमाळ, दि. २७ (जिमाका) :   सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णय नुसार राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेतील मागील चार वर्षातील   अर्ज सादर केलेल्या साहित्यिक व कलावंतांना आपल्या कला प्रकाराबाबत काही आक्षेप असल्यास ते सबळ पुराव्यांसह सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.             या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या काही साहित्यिक व कलावंतांनी त्यांच्या कलेचा प्रकार ३० टक्के साहित्यिक व प्रयोगात्मक कलाप्रकार किंवा ६० टक्के संघटित, असंघटित पारंपरिक लोककला या प्रवर्गात येत असतानाही त्यांची नावे १० टक्के भक्ती संप्रदाय कला प्रकारात समाविष्ट झाल्याबाबत तक्रारी जिल्हाधिकारी तथा राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेचे अध्यक्ष यांच्याकडे येत आहेत.             या पार्श्वभूमीवर संबंधित साहित्यिक व कलावंतांना आपल्या...

शासनमान्य ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी २५ लाखांपर्यंत अर्थसहाय्य

  > राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या विविध अर्थसहाय्य योजना ; > ३१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव पाठविण्यास मुदतवाढ              यवतमाळ, दि.   27   (जिमाका) : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान व असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध अर्थसहाय्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी ३१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास पाठविण्याचे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे प्र.संचालक अमोल गाडेकर यांनी केले आहे.             या योजनांसाठी आवश्यक असलेले नियम, अटी व अर्जाचा नमुना   www.rrrlf.gov.in   या संकेतस्थळावर उपलब्ध असून, इच्छुक ग्रंथालयांनी तेथून अर्ज डाउनलोड करून प्रस्ताव तयार करावेत.        ...

वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात ‘स्वच्छता पंधरवडा’ उत्साहात

Image
    यवतमाळ, दि. 27 (जिमाका) :   मेरा युवा भारत, यवतमाळच्या वतीने वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात ९ ते १७ ऑगस्टदरम्यान ‘स्वच्छता पंधरवडा’ उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कालावधीत महाविद्यालय परिसर, वर्गखोल्या तसेच बाह्य परिसराची स्वच्छता करुन विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली.              मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी सूरज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मेरा युवा भारतचे कार्यक्रम अधिकारी अनिल ढेंगे यांनी केले. उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रवी शेळके आणि विवेक राठोड यांनी विशेष सहकार्य केले.              स्वच्छता पंधरवड्या दरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान करुन संपूर्ण परिसर स्वच्छ केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल महाविद्यालयाचे सहयोगी अधिठाता सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना युनिट चे यांचे विशेष आभा...

महिला बचत गटांना गावस्तरावर ‘कृषी अवजारे बँक’ स्थापन करण्याची संधी

  २४ लाखांपर्यंत अनुदान ; ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन               यवतमाळ, दि. 25   (जिमाका) : राज्य शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत     जिल्ह्यातील ५४९ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कृषि यांत्रिकीकरणाला चालना देणे आवश्यक असून, सर्व शेतकऱ्यांना यंत्रसामग्री खरेदी करणे शक्य नसल्याने गावस्तरावर नोंदणीकृत महिला बचत गट यांचे मार्फत "गावस्तरावरील कृषि अवजारे बँक" स्थापन करून अनुदानित यंत्रसामग्री भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत व अचूक शेतीकाम करून उत्पादकता व नफा वाढविता येणार आहे.   त्याकरिता प्रकल्प गावांमध्ये "एक गाव एक कृषी औजारे बँक" या तत्त्वानुसार कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२६ अर्ज मागविण्यात येत आहेत. शेतीकामासाठी लागणारी यंत्रसामग्री भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचे श्रम आणि खर्च कमी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.   या योजनेसाठी   पोकरा अंतर...