पुसद येथील शासकीय मुलांचे वसतीगृहासाठी भाडेतत्त्वावर इमारतीची आवश्यकता
31 ऑगस्टपर्यंत
अर्ज करण्याचे आवाहन
यवतमाळ, दि.25 (जिमाका) : पुसद येथील शासकीय मुलांचे
वसतीगृहासाठी स्वतःची शासकीय इमारत उपलब्ध नसल्याने पुसद शहरात १५० विद्यार्थी क्षमतेची
सोयीसुविधा असणारी सुसज्ज इमारत भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे. यासाठी पुसद शहरातील
शाळा किंवा महाविद्यालयांच्या जवळ योग्य इमारत उपलब्ध असलेल्या मालकांकडून संमती अर्ज
मागविण्यात आले आहेत.
वसतीगृहासाठी उपलब्ध
होणाऱ्या इमारतीत १५० विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार आवश्यक खोल्या अथवा हॉल, कार्यालयीन
कक्ष, वाचनालय, स्वयंपाकगृह, भांडारगृह, स्वतंत्र स्नानगृह व स्वच्छतागृह तसेच सायकल
व वाहनांसाठी पुरेशी व्यवस्था असणे आवश्यक आहे. याशिवाय मुबलक व अखंडित पाणीपुरवठा
आणि योग्य विद्युत व्यवस्था असणे बंधनकारक आहे.
इमारतीचे मासिक भाडे
तसेच देखभाल-दुरुस्तीचा खर्च सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मूल्यांकनानुसार व मंजुरीनुसार
निश्चित करण्यात येणार आहे. शासनाच्या प्रचलित नियमांनुसार सर्व शासकीय कर तसेच इतर
अटी व शर्ती मान्य असल्याबाबत इमारत मालकास रीतसर करारनामा करावा लागणार आहे.
Comments
Post a Comment