जलसंवर्धनासाठी ‘महा वॉकेथॉन’मध्ये उसळला जनसागर !




 > माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिवस

> जिल्ह्यात जलसंधारण दिन मोठ्या उत्साहात साजरा

यवतमाळ, दि. २१ : मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिवसानिमित्त आयेजित आज २१ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात “जलसंधारण दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त जलसंधारण सप्ताहांतर्गत मृद व जलसंवर्धनाविषयी जनजागृतीसाठी समता मैदान येथे आयोजित ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ स्पर्धेसाठी जिल्ह्यातील २४ हजार २७४ नागरिकांनी नोंदणी करून उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अभूतपूर्व उपस्थिती नोंदविली. तसेच माती वाचवा, पाणी जपा आणि सुरक्षित भविष्य घडवा असा संदेश दिला.

समता मैदान येथे या महा वॉकेथॉनमध्ये सहभागी स्पर्धकांना योगासनाचे धडे, मृद व जलसंवर्धनाची शपथ देण्यात आली. त्यानंतर सकाळी ७ वाजताच्या सुमारास आमदार किसन वानखेडे व जिल्हाधिकारी विकास मीना यांनी महा वॉकेथॉनला हिरवी झेंडी दाखवून महा वॉकेथॉनला सुरुवात करण्यात आली.

३ किलोमीटरची महा वॉकेथॉन स्पर्धा संपल्यानंतर या वॉकेथॉन स्पर्धेमधील विजेत्यांची ईश्वर चिठ्ठीने निवड करण्यात आली. यात २५ हजारांचे प्रथम पारितोषिक शिवम संदिप बुटले, १५ हजारांचे द्वितीय पारितोषिक वेद यादव तर १० हजारांचे तृतीय पारितोषिक पायल रेड्डी या विद्यार्थ्यांनी पटकावला. या विजेत्यांना रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यासोबतच १८ स्पर्धकांना प्रत्येकी ३ हजार रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.

यावेळी आमदार किसन वानखेडे, नगराध्यक्ष ॲड. प्रियदर्शनी उईके, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष धोत्रे, उप वनसंरक्षक नवनीत मिश्रा, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, तरुण-तरुणी, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर