१५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह; जनजागृती साठी २१ ऑगस्टला महा वॉकेथॉन
यवतमाळ, दि.14 (जिमाका) : मृदसंधारण व जलसंधारणाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त जिल्हा परिषद येथील जि. बी. हॉलमध्ये मार्गदर्शन बैठक झाली.
यावेळी
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता
भूमेश दमाहे यांनी सर्व सरपंचांना विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.
माती व पाणी ही भविष्यातील पिढ्यांसाठी महत्त्वाची नैसर्गिक संसाधने असून त्यांच्या
संवर्धनासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
जलसंधारण
सप्ताहात युवकांचा सहभाग वाढवून सोशल मीडियावर जलसंधारण विषयक रील्स तयार करण्यास प्रोत्साहन
देण्यात यावे. तसेच २१ ऑगस्ट रोजी आयोजित ‘महा वॉकेथॉन -वॉक फॉर वॉटर’मध्ये युवकांनी
मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. वॉकेथॉनसाठी क्यूआर कोडद्वारे नोंदणी करण्याचे आवाहनही
करण्यात आले.
जल
व मृदा संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा,
असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने करण्यात आले.



Comments
Post a Comment