विस्तारित आकांक्षित तालुका कार्यक्रम; जिल्ह्यातील आठ तालुक्यांना मिळणार विकासाची नवी चालना
आकांक्षित तालुका कार्यक्रमात प्रायोगिक तत्वावर 6 तालुक्यांचा
समावेश
-प्रत्येक तालुक्याला पाच कोटींचा निधी
यवतमाळ, दि. 12
(जिमाका): महाराष्ट्र
शासनाद्वारे राज्यातील संतुलित व सर्वांगीण विकासासाठी आकांक्षित तालुका कार्यक्रमाचा
विस्तार करण्यात आला असून राज्यातील 10 जिल्ह्यांची व एकूण 177 तालुक्यांची 'विस्तारित
आकांक्षित जिल्हे व तालुके' म्हणून निवड करण्यात आली आहे.
या कार्यक्रमांतर्गत
यवतमाळ जिल्ह्यातील विस्तारित आकांक्षित तालुका म्हणून समावेश करण्यात आलेल्या केळापूर,
मारेगाव, महागाव, घाटंजी, उमरखेड व दिग्रस या 6 तालुक्यांचा समावेश प्रायोगिक तत्वावर
एक वर्षासाठी करण्यात आलेला आहे. तसेच पुसद व झरीजामणी या 2 तालुक्याचा केंद्र शासनाकडून
आकांक्षित तालुका म्हणुन समावेश यापुर्वीच करण्यात आलेला आहे.
तसेच राज्य
शासनामार्फत सर्व 177 आकांक्षित तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर एक वर्षाकरिता आकांक्षित
तालुका कार्यक्रम 2026-27 राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत
सर्व तालुक्यांना 5 कोटी रुपये प्रती तालुका
इतका निधी अनुदान स्वरुपात देण्यात येईल. तसेच सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या तालुक्यांना
सन 2026-27 मध्ये अतिरिक्त प्रोत्साहन निधी पुरस्कार स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात
येणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment