लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त यवतमाळमध्ये ग्रंथ प्रदर्शन
यवतमाळ दि.४ : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, यवतमाळ व स्व. मंगलाताई सतर्के सार्वजानिक वाचनालय, लक्ष्मीनगर, उमरसरा, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. मंगलाताई सतर्के सार्वजानिक वाचनालय येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस १ ऑगस्ट हा "लेखण प्रेरणा दिन" म्हणून व लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम व ग्रंथ प्रदर्शन आयोजित करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी व जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष मनोज रणखाम व सचिव प्रशांत पंचभाई, विद्यार्थी वाचक वर्ग उपस्थित होते.
००००
Comments
Post a Comment