वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात ‘स्वच्छता पंधरवडा’ उत्साहात


 

 यवतमाळ, दि. 27 (जिमाका) : मेरा युवा भारत, यवतमाळच्या वतीने वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात ९ ते १७ ऑगस्टदरम्यान ‘स्वच्छता पंधरवडा’ उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कालावधीत महाविद्यालय परिसर, वर्गखोल्या तसेच बाह्य परिसराची स्वच्छता करुन विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली.

            मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी सूरज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मेरा युवा भारतचे कार्यक्रम अधिकारी अनिल ढेंगे यांनी केले. उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रवी शेळके आणि विवेक राठोड यांनी विशेष सहकार्य केले.

            स्वच्छता पंधरवड्या दरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान करुन संपूर्ण परिसर स्वच्छ केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल महाविद्यालयाचे सहयोगी अधिठाता सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना युनिट चे यांचे विशेष आभार मानण्यात आले. या मोहिमेत महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन स्वच्छतेची शपथ घेतली. या प्रसंगी स्वच्छता अभियान जनजागृती करीता रॅली काढण्यात आली. त्यात युवकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेवून जनजागृती केली.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित