पॉलिटेक्निकच्या प्रथम व थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठी अतिरिक्त फेरी
यवतमाळ दि.7 :अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम प्रवेश पुस्तिका 2026-27 नुसार प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या चार फेऱ्यानंतर संस्थेमध्ये रिक्त राहिलेल्या जागांकरिता समुपदेशनाने प्रवेशाची अतिरिक्त फेरी संस्थास्तरावर राबविण्यात येणार आहे.
त्यानुसार दि. 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकीसाठी तसेच थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकीसाठी दि. 12 ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत नोंदणी केली जाणार आहे.
या प्रवेशप्रक्रियेसाठी या दिवशी www.dtemaharshtra.gov.in या संकेतस्थळावर कॅप अथवा नॅान कॅप ऑनलाईन नोंदणी केलेली विद्यार्थी या प्रवेश फेरीसाठी पात्र समजण्यात येतील.
प्रवेशासाठी उपरोक्त नमूद दिनांक व वेळत संस्थेत प्रत्यक्ष हजर राहावे. त्यानुसार विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येऊन त्याच दिवशी सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल त्या दिवशी दुपारी १ वाजेनंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.
या प्रवेश फेरीत नियमानुसार प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्याच दिवशी म्हणजे दि.11 ऑगस्ट रोजी प्रथम वर्ष पदविका व दि.12 ऑगस्ट रोजी थेट द्वितीय वर्ष पदविका करिता प्रवेश संस्थेत निश्चित करावा लागेल.
प्रवेश फेरीकरिता प्रवेश घेण्यास इच्छुक सर्व विद्यार्थ्यांनी (कॅप अथवा नॅानकॅप) आवश्यक त्या मूळ कागदपत्रासह व विहित शुल्कासह सकाळी १०.३० वाजता प्रवेशाकरिता शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ या संस्थेत हजर राहावे.
रिक्त जागांची माहिती www.gpyavatmal.ac.in संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.
या प्रवेश फेरीनंतर जागा रिक्त राहिल्यास, झाल्यास प्रवेश प्रक्रियेसाठी व त्याच वेळेनुसार दि. 13 व 14 ऑगस्ट रोजी प्रथम वर्ष पदविका व द्वितीय वर्ष पदविका प्रवेशाची संकेतस्थळावर समुपदेशाने पुनःप्रवेश फेरी राबवण्यात येईल.
अधिक माहितीसाठी प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकीसाठी प्रा. यू.एम.शिरभाते (९५११८१४९७४) तर थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकीसाठी प्रा.व्ही.एस. येंडे (९५०३७४६४९६) यांचेशी संपर्क करावा. याआधी इतरत्र प्रवेश घेतला असल्यास त्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतेवेळी प्रोफार्मा एन किंवा टीसीची मूळप्रत सादर करणे आवश्यक राहणार आहे.
000
Comments
Post a Comment