Posts

Showing posts from October, 2026

विशेष लेख - दुष्काळावर मात : हवी सर्वांची साथ

Image
  महाराष्ट्रात पावसाचा खंड आणि पिकांचे नुकसान पाहून राज्य शासनाने २६५ तालुक्यांमध्ये ट्रिगर - १ नुसार दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहिर करुन त्या भागातील दुष्काळावर मात करण्यासाठी १२ उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकरी - नागरिकांना सहाय्य करुन दुष्काळावर मात करायची आहे यासाठी सर्वांची भक्कम साथ अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातील शेती आणि शेतकरी हा प्रामुख्याने निसर्गाच्या कृपेवर आधारीत पावसावर अवलंबून आहे. आपल्या राज्यातील शेतीमध्ये कोरडवाहू शेती अधिक प्रमाणात केली जात असल्याचे आपल्या लक्षात येते. शेती ही पुर्णपणे पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना कधी कधी निसर्ग ही कृपादृष्टी करीत नाही व नैसर्गिक संकट निर्माण होते आणि आपला बळीराजा दुष्काळासारख्या संकटात आणि चक्रव्यूहात अडकला जातो. अशीच काही बिकट परिस्थिती यंद्याच्या खरीप हंगामा पासून आपल्या समोर येऊन ठेपली आहे.           पावसाचे प्रमाण, पावसातील तूट आणि पाऊस पडण्यातील मोठा खंड यावर आधारित ट्रिगर - 1 म्हणजे प्रथम कळ लागू क...

जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस पूर्णपणे बंदी जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आदेश जारी

              यवतमाळ, दि. 1 (जिमाका) :   यवतमाळ जिल्ह्यात चालू वर्षामध्ये पर्जन्यमान खंड स्वरुपात झाल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याने जिल्ह्यात पशुधनासाठी आवश्यक असणान्या चा-याची (हिरवा व सुका चारा) गोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील उपलब्ध चारा जिल्ह्याबाहेर वाहतूक केल्यास स्थानिक शेतकरी व पशुपालकांना आपल्या जनावरांच्या चान्यासाठी तीव्र टंचाईला सामोरे जावे लागेल, ज्यामुळे पशुधन धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील उपलब्ध चारा साठा स्थानिक पशुधनासाठी सुरक्षित ठेवणे आणि दुग्ध व्यवसायाला पूरक वातावरण टिकवून ठेवणे प्रशासकीय दृष्ट्या अत्यंत आवश्यक आहे.             आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम २५ पोटकलम (१) मधील धारा १४ उपधारा (१) मधील अधिसुचनेनुसार जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व कलम २५ मधील पोटकलम २ मध्ये...

निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ॲप कार्यशाळा

              यवतमाळ, दि. 1 (जिमाका) :   यवतमाळ कोषागार कार्यालयातर्फे राज्य शासनाच्या निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ अधिकृत मोबाईल ॲप कार्यान्वित करण्याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा मंगळवार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बळीराजा चेतना भवन (बचत भवन), जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, यवतमाळ येथे होणार आहे.             कार्यशाळेत प्रधान सचिव मार्गदर्शन करणार असून, निवृत्तीवेतनधारकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून ॲपबाबतच्या अडचणींचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन कोषागार अधिकाऱ्यांनी केले आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी जमिनीची नोंदणी , आधार सीडिंग आणि ईकेवायसी अनिवार्य

>२ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान विशेष मोहीम              यवतमाळ, दि. 1 (जिमाका) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी   योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नियमित हप्ते मिळण्यासाठी लँड सीडिंग, आधार सीडिंग करणे   आणि ईकेवायसी पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु जिल्ह्यात अजूनही ३५६३   शेतकऱ्यांचे ईकेवायसी   पूर्ण करणे बाकी आहे, ५२३० शेतकऱ्यांचे आधार सीडिंग पूर्ण करणे बाकी आहे तसेच ८४९ शेतकऱ्यांचे लँड सीडिंग पूर्ण करणे बाकी आहे.   केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार, यवतमाळ जिल्ह्यात दि. २ ऑक्टोबर २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सर्व प्रलंबित अटी पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.             शासनाच्या सूचनेनुसार योजनेच्या डेटाबेसमधील अपात्र, मृत किंवा निष्क्रिय नोंदी काढून तो पूर्णपणे अद्ययावत व पारदर्शक बनवणे हा या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश आहे ही मोहीम राबवून सर्व पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या प्रलंबित प्रक्रिया पूर्ण...

पुसद प्रकल्प कार्यालयातर्फे ‘माझी स्वच्छ, सुंदर व निरोगी आश्रमशाळा, वसतिगृह अभियान’

              यवतमाळ, दि. 1 (जिमाका) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच शासकीय वसतिगृहांमध्ये स्वच्छ, सुंदर, निरोगी आणि सुरक्षित निर्माण करण्याच्या उद्देशाने २ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘ माझी स्वच्छ, सुंदर व निरोगी आश्रमशाळा व वसतिगृह अभियान ’ राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक अमोल मेतकर यांनी दिली आहे.             या अभियानांतर्गत वैयक्तिक स्वच्छता, घनकचरा वर्गीकरण व व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, पाणीपुरवठा, परिसर स्वच्छता तसेच हरित परिसर निर्मिती यांसारख्या विविध बाबींवर विशेष भर देण्यात येणार आहे.             या अभियानात प्रकल्प अधिकारी, मुख्याध्यापक, अधीक्षक, गृहपाल, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांच्या संयुक्त व सक्रिय सहभागातून विविध स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार आहेत. १६ व १७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रकल्प ...

आदिवासी मुलांच्या वसतिगृह प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्ज सुरु

              यवतमाळ दि. ३० : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा अंतर्गत आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्रमांक २ पारिजात सोसायटी, वडगाव यवतमाळ येथील वसतिगृहाकरीता प्रवेश घेण्याकरिता ऑनलाईन अर्ज मागविणे सुरु आहे.             शैक्षणिक सत्र २०२६-२७ करीता वसतिगृहात प्रवेश घेण्याकरिता अर्ज ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. आपल्या मुळ कागदपत्रासह अर्ज करावा. तसेच जुन्या विद्यार्थ्यांना त्यांचा अर्ज रिन्युअल करायचा आहे. वसतिगृहाची क्षमता   वाढलेली असून ७५ वरुन २५० करण्यात आलेली आहे. त्यामुळे ह्या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. योजनेचा प्रथमता अर्ज करायचा आहे वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास त्यानंतर पंडित दीनदयाल योजनेत अर्ज वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावे व ऑनलाईन अर्जाची प्रत वसतिगृहाचे गृहपाल यांचेकडे सादर करावी असे आवाहन वसतिगहाचे गृहपाल सचिन बोराडे यांनी आवाहन केलेले आहे.

शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद

              यवतमाळ, दि. 1 (जिमाका) : यवतमाळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या उंच टाकीच्या व्हर्टिकल असेंब्लीची दुरुस्ती तसेच अन्य तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. या कामांमुळे ऑफीस मुख्य संतुलन टाकी (एमबीआर) झोन अंतर्गत येणाऱ्या शहरातील विविध भागांचा पाणीपुरवठा ३ व ४ ऑक्टोबर २०२६ रोजी दोन दिवस पूर्णपणे बंद राहणार आहे.             यामध्ये गोधनी, रुख्मिणी नगर-भोसा, चापडोह पुनर्वसन, जिंद्रान नगर, राजाराम नगर, आर.टी.ओ., सेवानगर आणि निखील नगर (उमरसरा) या भागांत   होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या कालावधीत नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा आणि आवश्यक तांत्रिक कामांसाठी संबंधित प्राधिकरणास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी, जल व्यवस्थापन संजय उमाळे यांनी केले आहे

सेवा संकल्प अभियानांतर्गत आदिवासी मुलांच्या वसतीगृहात सापांबद्दल जनजागृती

Image
              यवतमाळ, दि. 1 (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्र. २, पारीजात सोसायटी, वडगाव, यवतमाळ येथे विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, वक्तृत्व, निबंध व रांगोळी स्पर्धा, आरोग्य शिबिराचे नियोजन तसेच महापुरुषांच्या विचारांतून विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर सभेचे आयोजन करण्यात आले.             या उपक्रमाचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांमध्ये सापांविषयी असलेली भीती व गैरसमज दूर करण्यासाठी सर्पजनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्पदंश झाल्यास कोणत्या तातडीच्या उपाययोजना कराव्यात, काय करावे आणि काय करू नये, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.             कार्यक्रमाच्या सुरुवातीस गृहपाल सचिन बोराडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर आद्य क्रांतिकारक महामानव बिरसा मु...

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

                          ३ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार नवमतदारांना नाव नोंदणीची सुविधा             यवतमाळ, दि. 1 (जिमाका) :   भारत निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा सुधारित वेळापत्रक जाहीर केला आहे. त्यानुसार मतदार यादीवरील दावे व हरकती सादर करण्यासाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.             या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीसाठी यापूर्वी सप्टेंबर महिन्यात सर्व मतदान केंद्रावर विशेष शिबीर आयोजित करण्यात आले होते. मात्र, भारत निवडणूक आयोगाने पुनरीक्षण कार्यक्रमाला मुदतवाढ दिल्याने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार नवमतदार व नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची सुविध उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यातील वि...