सेवा संकल्प अभियानांतर्गत पारधी समाजासाठी विशेष महाशिबीर शिरोली ग्रामपंचायतीत आयोजन

यवतमाळ, दि. 15 (जिमाका) : सेवा संकल्प अभियानातंर्गत घाटंजी तालुक्यातील शिरोली ग्रामपंचायत कार्यालयात दि. १२ ऑक्टोबर रोजी पारधी समाजासाठी विशेष महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, कृषी व आरोग्य विभाग तसेच शिक्षण व पुरवठा विभागाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. या महाशिबिराचे आयोजन महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी मंडळ अधिकारी चेतन नामदेवराव कोडापे आणि ग्राम महसूल अधिकारी प्रवीण ताकसांडे उपस्थित होते. शिबिरात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या आणि शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली. शिरोली येथील या विशेष शिबिराचा परिसरातील पारधी समाजातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. या शिबिरात एकूण ७४ लाभार्थींना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य विभागांतर्गत ३३, सहकार विभागांतर्गत १२ आणि इतर विभागांतर्गत १३ नागरिकांना विविध सेवा व लाभाचे वितरण करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित