उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र वितरण

 


> यूडीआयडी पोर्टलवर अर्ज केलेल्यांना मिळणार प्रमाणपत्र ;

> दर गुरुवार, शनिवार आणि सोमवारी वितरण

> पांढरकवडा, दारव्हा, पुसदच्या रुग्णालयांमध्ये सुविधा

 

            यवतमाळ, दि. 6 (जिमाका) : जिल्हा शल्यचिकित्सक अंतर्गत येणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये यूडीआयडी पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करणाऱ्या दिव्यांगाना विशेष तज्ज्ञांमार्फत दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येत आहे. पांढरकवडा, दारव्हा आणि पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दर महिन्याला निश्चित दिवशी ही सेवा उपलब्ध राहणार आहे.

            उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी अस्थिरोग, मेडीसीन आणि बालरोग तज्ज्ञांच्या माध्यमातून दिव्यांग प्रमाणपत्रासाठी तपासणी व वितरणाची सेवा दिली जाणार आहे. तसेच महिन्यातील प्रत्येक  शनिवारी नेत्ररोग तज्ज्ञ उपलब्ध राहणार आहेत.

उपजिल्हा रुग्णालय दारव्हा येथे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी अस्थिरोग आणि नेत्ररोग तज्ज्ञांच्या माध्यमातून दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आवश्यक तपासणी व प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार आहे.

उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे  महिन्याच्या प्रत्येक सोमवारी अस्थिरोग, नेत्ररोग, मेडीसन आणि बालरोग तज्ज्ञांच्या माध्यमातून दिव्यांग प्रमाणपत्राची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

            या तिन्ही तालुक्यांतील ज्या दिव्यांगांनी यूडीआयडी पोर्टलवर अर्ज केला आहे, त्यांनी संबंधित रुग्णालयात निश्चित केलेल्या दिवशी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत उपस्थित राहावे. आवश्यक वैद्यकीय तपासणी व तज्ज्ञांच्या अभिप्रायानंतर पात्र लाभार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे.

            संबंधित उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित