पुसद प्रकल्प कार्यालयातर्फे ‘माझी स्वच्छ, सुंदर व निरोगी आश्रमशाळा, वसतिगृह अभियान’
यवतमाळ, दि. 1
(जिमाका) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद अंतर्गत येणाऱ्या
सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच शासकीय वसतिगृहांमध्ये स्वच्छ, सुंदर, निरोगी
आणि सुरक्षित निर्माण करण्याच्या उद्देशाने २ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत
‘माझी स्वच्छ, सुंदर व निरोगी आश्रमशाळा
व वसतिगृह अभियान’राबविण्यात
येणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक अमोल मेतकर यांनी दिली आहे.
या अभियानांतर्गत वैयक्तिक स्वच्छता, घनकचरा
वर्गीकरण व व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, पाणीपुरवठा, परिसर स्वच्छता तसेच हरित
परिसर निर्मिती यांसारख्या विविध बाबींवर विशेष भर देण्यात येणार आहे.
या अभियानात प्रकल्प अधिकारी, मुख्याध्यापक,
अधीक्षक, गृहपाल, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांच्या संयुक्त व सक्रिय
सहभागातून विविध स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार आहेत. १६ व १७ ऑक्टोबर २०२६ रोजी
प्रकल्प अधिकारी किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींमार्फत अभियानांतर्गत राबविण्यात
आलेल्या स्वच्छता उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. या पाहणीच्या आधारे
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा आणि शासकीय वसतिगृहांमधून
प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची निवड करण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment