Posts

Showing posts from April, 2026

स्वाधार' योजनेतील त्रृटी पूर्ण करण्यासाठी 5 मेपर्यंत मुदतवाढ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केलेल्या, परंतु कागदपत्रांतील त्रुटींमुळे कार्यालयस्तरावर प्रलंबित असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी दि. 5 मेपर्यंत त्रृटी पूर्ण कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जे विद्यार्थी कागदपत्राची पुर्तता करणार नाही अशा विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात सदर विद्यार्थ्यांस अर्ज करता येणार नाही व तो स्वाधार योजनेपासुन वंचित राहील. असे आयुक्तालय समाज कल्याण पुणे यांनी कळविले आहे. तेव्हा स्वाधार योजने करीता विद्यार्थ्यांनी अर्ज ऑनलाईन सर्व कागदपत्रासह अपलोड करुन 5 मे पर्यंत प्रस्तुत कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे परंतु हार्डकॉपी अद्याप कार्यालयात सादर केलेले नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांनी विहीत कालावधीत अर्ज सादर न केल्यास व सदर योजनेपासुन विद्यार्थी वंचित राहिल्यास सदर बाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची राहील. तसेच निर्धारीत मुदतीत त्रुटी पुर्तता न केल्यास आपला अर्ज अपात्र ठरणार कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी, ...

खरीप हंगामाअंतर्गत महाडीबीटी योजनांच्या लाभाकरीता शेतकऱ्यांनी पोर्टलवर अर्ज करावे

 जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांचे आवाहन कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनानुसार, राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया), राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान आणि कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत विविध घटकांसाठी महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. प्रमुख ठळक बाबी : योजनेचे नाव: राष्ट्रीय खाद्यतेल अभियान - तेलबिया, राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान, व कडधान्य आत्मनिर्भरता अभियान, उपलब्ध घटक: प्रमाणित बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिके, समाविष्ट पिके: गळीतधान्य, अन्नधान्य आणि कडधान्य, अर्जाची पद्धत: महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. उद्देश : खरीप हंगामात तेलबिया व कडधान्य पिकांचे क्षेत्र आणि उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना सुधारित वाणांचे दर्जेदार बियाणे वेळेवर उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आह...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन

Image
जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अधिक्षक अदित्य शेंडे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याबाबत जनजागृती शिबीर

Image
 जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत आयोजन यवतमाळ दि. 30 (जिमाका): महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ शेखर सी. मुनघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ व विनायकराव बापू देशमुख कॉलेज ऑफ नर्सिंग, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २९ एप्रिल रोजी “प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा १९९४” या विषयावर कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ दिपक एच. दाभाडे होते. प्रमुख उपस्थितीत नाना गंडे, अनिल गायकवाड (सदस्य, बाल कल्याण समिती) तसेच प्राचार्य, विनायकराव बापू देशमुख कॉलेज ऑफ नर्सिंग, यवतमाळ सिध्दु मुराल उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून वैद्यकीय अधिकारी, एनआरसी, जिल्हा महिला रुग्णालय, यवतमाळ डॉ. रुपाली सावळे उपस्थित होत्या. डॉ. रुपाली सावळे यांनी प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा १९९४ (PCPNDT Act) बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. गर्भल...

जल व्यवस्थापन कृती पंधरवडाअंतर्गत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

Image
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६” अंतर्गत यवतमाळ येथील केमिस्ट भवन येथे जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत पूर परिस्थितीत घ्यावयाच्या उपाययोजना, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने टीडीआरएफ चे संचालक तथा शासनाचे अधिकृत आपत्ती व्यवस्थापन मास्टर ट्रेनर हरिश्चंद्र बद्रीनाथ राठोड यांनी प्रमुख प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश राठोड यांनी प्रास्ताविक केले. आपल्या मार्गदर्शनात हरिश्चंद्र राठोड यांनी “आजूबाजूचे संभाव्य धोके ओळखून योग्य पूर्वतयारी केल्यास आपत्तीची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी करता येते. प्रशिक्षणाचा प्रभावी वापर केल्यास आपण स्वतःचा तसेच इतरांचा जीव वाचवू शकतो. एक प्रशिक्षित व्यक्ती किमान दहा लोकांचे जीव वाचवू शकतो असे सांगितले. घरातील वापरात नसलेल्या वस्तूंपासून तात्पुरते बचाव साहित्य कसे तयार करता येते...

जिल्ह्यातील पीएम-किसान लाभार्थ्यांना २० मेपर्यंत ‘फार्मर आयडी’ काढण्याचे आवाहन

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ‘फार्मर आयडी’ फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी २० मे २०२६ पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विहित मुदतीत फार्मर आयडी न काढल्यास भविष्यात कृषी विभागाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे. जिल्ह्याची सद्यास्थिती : केंद्र शासनाच्या ‘अॅग्रीस्टॅक’मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांची डिजिटल नोंदणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सद्यस्थितीनुसार पीएम-किसान योजनेअंतर्गत एकूण २,लाख ९५ हजार १८३ लाभार्थी असून, त्यापैकी २ लाख ६२ हजार ११ शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी उपलब्ध आहे. मात्र, अद्याप ३३ हाजर १७२ लाभार्थ्यांचे फार्मर आयडी प्रलंबित आहेत. फार्मर आयडीचे महत्त्व : १५ एप्रिल २०२५ पासून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. फार्मर आयडी तयार झाल्यानंतर पीएम-किसान पोर्टलवरील e-KYC व Land S...

जिल्हा परिषद येथे “लोकसेवा हक्क दिन” उत्साहात साजरा

जिल्हा परिषद सभागृह, यवतमाळ येथे दिनांक २८ एप्रिल रोजी “लोकसेवा हक्क दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. नागरिकांच्या अधिकारांना कायदेशीर बळ देणारा आणि प्रशासन अधिक जबाबदार बनवणारा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. महाराष्ट्र शासनाच्या “महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५” अंतर्गत नागरिकांना विविध शासकीय सेवा निश्चित कालमर्यादेत मिळण्याची हमी देण्यात आली आहे. या कायद्यामुळे प्रशासनावर सेवा वेळेत देण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, सेवा उशिरा दिल्यास किंवा नाकारल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. तसेच नागरिकांना प्रथम व द्वितीय अपील करण्याचा अधिकारही प्रदान करण्यात आला आहे. “आपले सरकार” पोर्टल https://aaplesarkar.mahaonline.gov.in च्या माध्यमातून नागरिकांकडून विविध दाखल्यांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात असून, ग्रामपंचायत स्तरावर ते विहित मुदतीत देणे बंधनकारक आहे. या प्रक्रियेमुळे प्रशासनात पारदर्शकता, शिस्त आणि उत्तरदायित्व निर्माण झाले आहे. शासनाच्या निर्देशानुसार २८ एप्रिल हा दिवस “लोकसेवा हक्क दिन” म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेत सर्व अधिकारी...

4 मे रोजी लोकशाही दिन

महिन्यातील पहिल्या सोमवारी दि. 4 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा लोकशाही दिनामध्ये न्याय प्रविष्ट प्रकरणे, राजस्व अपिल प्रकरणे, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे असे स्वीकारण्यात येणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तीक स्वरुपाची नसावी. महिन्यातील तिसऱ्या सोमवारी तालुका स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये अर्जाचे निराकरण न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज सादर करावा. तसेच अर्ज दाखल करतेवेळी तालुका स्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल केल्याची पोच जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये सादर करावी. याशिवाय संबंधित अर्ज स्विकारले जाणार नाही, यांची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

सहकारी आदिवासी विकास महामंडळ ट्रक वाहनांचा ई-लिलाव

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ यवतमाळ कार्यालय अंतर्गत ट्रक वाहनांचा 7 मे 2026 रोजी दुपारी 12 ते 5 या वेळेत ई-लिलाव करण्यात येणार आहे.इच्छुकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. ट्रक क्रमांक एम एच १५ ईजी २०३१ खरेदी वर्ष १८ जुलै २०१४ अनामत रक्कम २५ हजार ट्रक क्रमांक एम एच १५ ईजी २०३२ खरेदी वर्ष १८ जुलै २०१४ अनामत रक्कम २५ हजार ट्रक क्रमांक एम एच १५ईजी २०३३ खरेदी वर्ष १८ जुलै २०१४ अनामत रक्कम २५ हजार ट्रक क्रमांक एम एच १५ ईजी २०३४ खरेदी वर्ष १८ जुलै २०१४ अनामत रक्कम २५ हजार ट्रक क्रमांक एम एच १५ ईजी २०३५ खरेदी वर्ष १८ जुलै २०१४ अनामत रक्कम २५ हजार हि वाहने ई-लिलावात विक्रीस ठेवण्यात येत आहेत. www.market.neml.in या Neml च्या पोर्टलवर विक्री करण्यात येत आहे. तेव्हा लिलावाच्या अटी/शर्ती पुढील प्रमाणे आहेत. सदर ई-लिलाव वाहने नियमानुसार आदिवासी भागातील आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार अवजड परवानाधारक गरजु व होतकरु बांधवांना आयेजीत करण्यात येत आहे. लिलावामध्ये जे आदिवासी बांधव सहभागी होतील अशा बांधवाकडे अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे अनिवार्य राहील. वाहने विक्री के...

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन प्लॅस्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करु नये

स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक व महाराष्ट्र दिन राज्यभर साजरा करण्यात येतात. यावेळी राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान व्हावा हे प्रत्येक सुजाण नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यामुळे 1 मे महाराष्ट्र दिनी प्लॅस्टीक ध्वजाचा वापर करु नये. राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता होय. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होता कामा नये. राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याने स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, सुजाण व जागरुक नागरिक, ग्रामपंचायत, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आरोग्य संस्था, सर्व खाजगी संस्था यांनी स्थानिक पोलीस यंत्रणेच्या मदतीने अशा प्रकारे प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही याबाबत काळजी घ्यावी तसेच विक्रेत्यांनी प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करु नये. प्लॅस्टीकचे ध्वज आढळुन आल्यास संबंधित तहसिलदार किंवा नगरपालिका कार्यालयात असे ध्वज जमा करावेत. तसेच महाराष्ट्र दिनी या कार्यक्रमा प्रसंगी जिल्ह्यातील नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी प्लॅस्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण

Image
 पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते लोकार्पण  आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ. अशोक उईके यांची उपस्थिती जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे आज पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते आणि आदिवासी विकास मंत्री ना. प्रा.डॉ. अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला आ. किसन वानखेडे, नगराध्यक्ष ॲड. प्रियदर्शनी उईके, पोलीस अधिक्षक कुमार चिंता, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अधिक्षक अभियंता सुषमा बोंद्रे, लाप्रविचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे, पोलीस उपअधीक्षक अभय आष्टेकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री ना. संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री ना. प्रा.डॉ. अशोक उईके यांनी या सुसज्ज इमारतीचे कौतूक केले. शासनाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि लोकांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. तसेच नागरिकांमध्ये शासन व विभागाची चांगली प्रतिमा निर्माण होण्यासाठी लोकसहभाग, लोक...

१ मेपासून स्व-गणनेला सुरुवात

नागरिकांना स्वत:ची माहिती भरण्याची सुविधा ; जिल्हा प्रशासनाचे आवाहन देशभरात जनगणनेचे कामकाज सुरू झाले असून पहिल्या टप्प्यात घरयादी व घरगणना हे कार्य डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत नागरिकांसाठी स्व-गणना (Self Enumeration) करण्याची सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत https://se.census.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाइन पद्धतीने सहजपणे भरता येणार असून ही प्रक्रिया सुरक्षित, सुलभ आणि सोयीस्कर आहे. जनगणना प्रक्रियेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. जनगणना हे राष्ट्रहिताचे महत्त्वाचे कार्य असल्याने जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी 1 मेपासून सुरू होणाऱ्या स्व-गणनेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपली माहिती स्वतः भरावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा

Image
उत्कृष्ट सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ चा अंमलबजावणीला ११ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने मंगळवारी आयोजित ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित या कार्यक्रमास आमदार किसन वानखेडे, नगराध्यक्षा ॲड. प्रियदर्शनी उईके, सहायक जिल्हाधिकारी रेवैय्या डोंगरे, उपजिल्हाधिकारी देशपांडे, पुनम अहिरे, उपजिल्हाधिकारी अविनाश शिमटे, तहसिलदार राहुल मोरे, प्र.पोलीस उपअधिक्षक सुनील हुड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आमदार किसन वानखेडे म्हणाले की, आपण सामान्य व्यक्तींच्या सेवेसाठी कार्यतत्परत आहोत. काम करत असतांना शेतकरी, महिला, युवक, सामान्य नागरिकांची वेळेवर कामे तात्काळ केली पाहिजे. सामान्य लोकांची कामे वेळेत केल्या तर अडचणी येणार नाही. प्रशासनाने पारदर्शकता, उत्तरदायित्व, कालमर्यादा आणि कार्यक्षमता या चार स्तंभावर काम केले पाहिजे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत विहित काल कालमर्याद...

शासकीय कामे वेळेत करा ..!

Image
- राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक  पुसद तालुक्यातील विकासकामांचा घेतला आढावा पुसद तालुक्यातील विविध विभागांच्या कामांचा राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक यांनी पुसद येथे सोमवारी सविस्तर आढावा घेतला. वन विभागाच्या कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीस नगराध्यक्ष मोहिनी इंद्रनील नाईक, उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, उपवनसंरक्षक श्री स्वामी, तहसीलदार रेखा वाणी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि पुसद तालुक्यातील आठ जिल्हा परिषद सर्कलचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत शासकीय कामे वेळेत आणि जबाबदारीने पूर्ण करणे आवश्यक असून कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. कामात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी पुसद तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा महत्वाचा ठरला. रस्त्यांची कामे तात्काळ सुरू करावीत तसेच दुरुस्तीची प्रलंबित कामे विलंब न लावता पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्य...

'युवा संवाद' करिअर मार्गदर्शन सत्र उत्साहात ; विद्यार्थ्यांना मिळाली अभ्यासाची दिशा

Image
जिल्हा प्रशासनामार्फत तरुणांसाठी आयोजित युवा संवाद उपक्रमांतर्गत तहसीलदार हेमकृष्ण पिसदे यांचे मार्गदर्शन सत्र उत्साहपूर्ण वातावरणात आणि विद्यार्थ्यांच्या सहभागात यशस्वीरित्या पार पडले. यावेळी उपजिल्हाधिकारी पूनम अहेरी, मुख्यमंत्री फेलो विठ्ठल गाडगे आणि स्पर्धा परीक्षार्थी उपस्थित होते. तहसीलदारहेमकृष्ण पिसदे यांनी आपल्या संघर्षमय प्रवासातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडत युपीएससी आणि एमपीएससी परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक असलेली माहिती दिली. त्यांनी तयारीदरम्यान येणाऱ्या अडचणी, सातत्याचे महत्त्व तसेच योग्य नियोजन आणि अभ्यासाची परिणामकारक रणनीती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सत्रादरम्यान विद्यार्थ्यांना शालेय पातळीवरील पाठ्यपुस्तकांपासून भक्कम पाया तयार करण्याचे महत्त्व, विषयांचा समन्वय साधत अभ्यास करण्याची पद्धत, सातत्य आणि पुनरावृत्तीची गरज, तसेच आळशीपानाची सवय कशी टाळावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच युपीएससी/एमपीएससी या परीक्षेत दीर्घकालीन आणि शिस्तबद्ध प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळणार असल्याचेही अधोरेखित करण्यात आले. या सत्रातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्पष्ट दि...

राष्ट्रीय लोकअदालत ९ मे रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये एकाच दिवशी सुनावणी

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये दिनांक ९ मे २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. एकाच दिवशी जिल्ह्यातील सर्व स्तरांवरील न्यायालयांमध्ये लोकअदालतीचे आयोजन होत असल्याने प्रलंबित वाद जलदगतीने निकाली काढण्यास मोठी मदत होणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शेखर बु. मुनपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १०.३० वाजता जिल्हा न्यायालय, यवतमाळ येथे या लोकअदालतीचा शुभारंभ होणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये, कामगार व औद्योगिक न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, ग्राहक तक्रार निवारण मंच तसेच इतर न्यायाधिकरणांमध्येही एकाच वेळी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकील संघ, यांचा संयुक्त सहभाग असून संपूर्ण न्यायव्यवस्थेचा समन्वय साधून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रक...

कारेगाव पारधी बेडा येथे टॅंकरद्वारे दररोज ३० हजार लिटर पाणीपुरवठा सुरु

उपविभागीय अधिकारी यांची माहिती आर्णी तालुक्यातील कारेगाव पारधी बेडा येथे १५ एप्रिल पासून नियमितपणे दररोज एक वेळा शासकीय टँकरद्वारे तीस हजार लिटर पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे यांनी दिली आहे. ही वस्ती ग्रामपंचायत अंजी अंतर्गत येत असून ती वनविभागाच्या जमिनीवर वसलेली आहे. वनहक्क कायद्यानुसार पट्टा मंजुरीचे प्रकरण सध्या जिल्हास्तरीय समितीकडे प्रलंबित आहे, उपविभागीय अधिकारी, यवतमाळ यांनी १० एप्रिल रोजी या ठिकाणी प्रत्यक्ष स्थळभेट देऊन पाणीपुरवठ्याच्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. त्यापार्श्वभूमीवर १५ एप्रिल पासून नियमितपणे दररोज एक वेळा शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कारेगाव पारधी बेडा या भागातील पाणीटंचाईबाबत प्रशासनाशी संपर्क करावा, असे आवाहन यवतमाळचे उपविभागीय अधिकारी गोपाल देशपांडे यांनी केले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात 287 रुग्णांना सुमारे 2.38 कोटींची मदत

• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ‘आधार’ ठरत आहे. यवतमाळ जिल्ह्यात आर्थिक वर्षात 287 रुग्णांना सुमारे 2 कोटी 38 लाख 52 हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रूग्णालय, धर्मादाय रूग्णालय, संस्था, दाते आदींच्या सहकार्य लाभत आहे. मुख्यमंत्री सहायता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरित्या वाढला आहे. परिणामी, अधिकाधिक पात्र रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळत आहे. 20 गंभीर आजारासाठी मदत : कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्ष 2 ते 6), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हाताचे, गुडघ्याचे...

जिल्हाधिकारी विकास मीना यांचा राज्यस्तरीय सन्मान होणार

सेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी “अभिप्राय कक्ष” हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल जिल्हाधिकारी विकास मीना यांचा राज्यस्तरीय सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात येणार आहे. “द्वितीय सेवा हक्क दिन” निमित्त सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आला असून मुख्य आयुक्त, महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. “अभिप्राय कक्ष” या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे नागरिकांना अधिक संवेदनशील, पारदर्शक व तत्पर सेवा देणे शक्य झाले असून, त्यास व्यापक प्रतिसाद व यश मिळाले आहे. या उपक्रमाद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण झाला असून, त्यातून प्रशासनातील सेवा वितरण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडण्यास मदत झाली आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सह्याद्री अतिथीगृह येथील सभागृहात मुख्य सचिव यांच्या हस्ते जिल्हाधिकारी विकास मीना यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. या सोहळ्यास वरिष्ठ ...

भूजल पातळी वाढविण्यासाठी ‘जलतारा’ संकल्पनेंतर्गत शेत शोषखड्डा योजना > शेतकऱ्यांनी शेतात शोषखड्डा तयार करावा > प्रथम अर्ज- प्रथम प्राधान्य तत्वावर लाभ मिळणार

यवतमाळ दि. 24 (जिमाका) : भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत ‘जलतारा’ संकल्पनेवर आधारित यंत्राद्वारे शेत शोषखड्डा योजना राबविण्यात येत असून या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात शोषखड्डा तयार करता येणार आहे. “आज पाणी जपले तरच उद्याचे शेती भविष्य सुरक्षित” असा संदेश देत त्यांनी शेतकऱ्यांना शेत शोषखड्डा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. शासनामार्फत राबविण्यात येणारी ‘जलतारा’ संकल्पनेवर आधारित शेत शोषखड्डा योजना ही केवळ योजना नसून शेतकऱ्यांसाठी जीवनदायी उपाय असल्याचे सांगण्यात आले आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेत शोषखड्ड्याची आवश्यकता का? पावसाचे मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पाणी वाया जात आहे, विहिरी कोरड्या पडण्याचे प्रमाण वाढत आहे, भूजल पातळी सातत्याने घटत आहे तसेच अतिवृष्टीमुळे मातीची धूप होऊन सुपीकता कमी होत आहे. या सर्व समस्यांवर प्रभावी उपाय म्हणजे शेतात पाणी अडवणे व जमिनीत मुरवणे हेच असल्याचे कृषी विभागाने केले आहे. शेत शोषखड्ड्याचे फायदे शोषखड्ड्यामुळे जम...

जिल्ह्यातील १३ तलाव मासेमारीसाठी ठेक्याने देण्यात येणार > मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी ११ मेपर्यंत प्रस्ताव सादर करावे > मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तांचे आवाहन

यवतमाळ दि.२४ (जिमाका) : पाटबंधारे, जलसंधारण विभागाकडून मत्स्यव्यवसाय विभागाकडे मासेमारी हक्काचे हस्तांतरण झालेले ०-५०० हेक्टर पर्यंतचे तलाव शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय तलाव ठेका समितीमार्फत पात्र संस्थांना मासेमारीसाठी ठेक्याने देण्यात येतात. सन २०२६-२७ ते २०३०-३१ या पाच वर्ष कालावधीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील ५०० हेक्टरपर्यंतचे एकूण १३ तलाव मासेमारीसाठी ठेक्याने देण्यात येणार आहेत. त्यासाठी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे. या १३ तलावांमध्ये तरोडा (ता. उमरखेड), खरद (ता. यवतमाळ) , मजरा (ता. राळेगाव), येडशी (ता. राळेगाव), राजूर (ता. कळंब), अर्जुना (ता. यवतमाळ), उमडा (ता. यवतमाळ), कापरा (ता. बाभूळगाव), डिगडोह (ता. राळेगाव), टाकळी (ता. यवतमाळ), करणवाडी (ता. केळापुर), पाचपहूर (ता. झरीजामणी), देवगाव (ता. आर्णी) हे तलाव मासेमारीकरीता ठेक्याने द्यावयाचे आहेत. या तलावांपैकी संबंधित तलावांसाठी नोंदणीनुसार, उपविधीतील कार्यक्षेत्रानुसार पात्र असणाऱ्या मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी तलाव ठेका मागणी परिपूर्ण प्रस्ताव दि.११ मे २०२६ रोजी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय...

बोगस बियाण्यांपासून सावध रहा > कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन > मार्गदर्शक सूचना जारी

यवतमाळ दि.२४ (जिमाका) : आगामी खरीप हंगाम लक्षात घेला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर बियाणे व खते यांची विक्री सुरु होणार आहे. मात्र काही विकाणी अनधिकृत आणि बोगस (बनावट) कापूस बियाण्यांची विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनानुसार बियाणे खरेदी करतांना बिल नसलेले, खोटी जाहिरात, जास्त उत्पन्नाचे आश्वासन देणाऱ्या व्यक्तीच्या भूलथापांना आणि आमिषांना बळी पडू नका. अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करा. बियाणे नेहमी परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करावे. रस्त्यावर किंवा अनधिकृत व्यक्तीकडुन बियाणे घेवू किंवा खरेदी करु नये. बियाणे खरेदीचे पक्के बिल घ्या- अधिकृत परवानाधारक कृषी केंद्रामधून बियाणे खरेदी करतांना त्याचे पक्के बिल घ्या. बिलांवर पिकांचे नाव, वाण, लॉट क्रमांक, बियाण्यांची वैधता मुदत, बियाण्यांचा दर व एकुण मुल्य इत्यादी मजकुर स्पष्ट नमूद असल्याबाबत खात्री करा, अशा मार्गदर्शक सूचना कृषी विभागाने जारी केल्या आहेत. “एचटीबीटी”वर कायद...

“मिशन लक्ष्यवेध" अंतर्गत 27 एप्रिल रोजी अॅथलेटिक्स निवड चाचणी

यवतमाळ दि.२४ : राज्यातील क्रीडा विकासाला गती देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या "मिशन लक्ष्यवेध" या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्र स्थापन करण्यात येत असून, त्यासाठी अॅथलेटिक्स क्रीडा प्रकारातील खेळाडूंची निवड करण्यासाठी निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. ही निवड चाचणी दि. 27 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, यवतमाळ येथे घेण्यात येणार आहे. सदर चाचणीमध्ये खेळाडूंच्या क्रीडा कौशल्यांच्या चाचण्या घेऊन गुणवत्ता आधारित निवड केली जाणार आहे. या निवड प्रक्रियेत ज्या खेळाडूंनी पूर्वी अर्ज सादर केलेले आहेत त्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच, ज्या इच्छुक खेळाडूंनी अद्याप नोंदणी केलेली नाही, परंतु या चाचणीत सहभागी होण्याची इच्छा आहे, अशा खेळाडूंनाही अर्जासह थेट उपस्थित राहून सहभाग नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी सचिन हरणे यांना 9890981728 या क्रमांकावर संपर्क करुन शंकांचे निरसन करावे, जास्तीत जास्त लोकांनी या चाचणीत सहभागी होण्याचे आव्हान जिल्हा क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार यां...

मांग, मांतग समाजातील बांधवांसाठी कार्यशाळेचे आयोजन

यवतमाळ दि.24 (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मर्या. यवतमाळ मार्फत मांतग समाज व तत्सम १२ पोट जातीतील वंचित असलेल्या नागरिकांसाठी यवतमाळमध्ये 30 एप्रिल रोजी कार्यशाळचे आयोजन करण्यात आले आहे. मांग व मांतग समाजातील लोकांना विविध योजनांची माहिती देणे तसेच समाजातील लोकांचे जीवनमान उंचावावे या कार्यशाळेचे मुख्य उद्देश आहे. ही कार्यशाळा सामाजिक न्याय भवन, पळसवाडी कॅम्प, दारव्हा रोड, यवतमाळ येथे दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे. मांतग समाज व तत्सम १२ पोटजातील नागरिकांनी या कार्यशाळेत उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एम.टी. खडसे यांनी केले आहे. ०००००

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ण करा > समाज कल्याण विभागाने विद्यार्थ्यांना आवाहन

यवतमाळ दि.24 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी अर्जातील त्रुटी तत्काळ पूर्ण कराव्यात, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे. तसेच संबंधित विद्यार्थ्यांनी 30 एप्रिल 2026 पर्यंत ऑनलाईन त्रुटींची पूर्तता करुन त्याची प्रत कार्यालयात सादर करण्याची मुदत देण्यात येत आहे. स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी सर्व कागदपत्रासह अर्ज ऑनलाईन अपलोड करुन दि. 30 एप्रिलपर्यंत समाज कल्याण कार्यालयास सादर करावेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला आहे परंतू त्याची प्रत अद्याप कार्यालयात सादर केलेली नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांनी विहित कालावधीत अर्ज सादर न केल्यास किंवा योजनेपासून विद्यार्थी वंचित राहिल्यास याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची राहणार आहे. तसेच निर्धारित मुदतीत त्रुटी पूर्ततता न केल्यास अर्ज अपात्र ठरणार याची नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मंगला मुन यांनी केले आहे. ००० --

२६ एप्रिलला महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक

>वैद्यकीय महाविद्यालयात पाच मतदान केंद्र ; मतदार यादी प्रसिद्ध यवतमाळ, दि. २३ : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक २०२६ येत्या २६ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पार पडणार असून, या निवडणुकीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील २०४२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीसाठी श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे पाच मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्र क्रमांक १ डेमॉन्स्ट्रेशन हॉल क्रमांक १ येथे मतदार क्रमांक १ ते ४००, मतदान केंद्र क्रमांक २ डेमॉन्स्ट्रेशन हॉल क्रमांक २ येथे मतदार क्रमांक ४०१ ते ८००, मतदान केंद्र क्रमांक ३ लायब्ररी कम सेमिनार रूम येथे मतदार क्रमांक ८०१ ते १२००, मतदान केंद्र क्रमांक ४ एफएमटी म्युझियम हॉल क्रमांक १ येथे मतदार क्रमांक १२०१ ते १६००, तर मतदान केंद्र क्रमांक ५ एफएमटी म्युझियम हॉल क्रमांक २ येथे मतदार क्रमांक १६०१ ते २०४२ यांची मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारांची यादी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, मतदारांनी आपला मतदान केंद्र क्रमांक आणि इतर तपशील संकेत...

जिल्ह्यात २७ एप्रिलपासून १९ मेपर्यंत विशेष कर्करोग निदान मोहीम

यवतमाळ, दि. २३ : जिल्ह्यात २७ एप्रिल ते १९ मे २०२६ या कालावधीत विशेष कर्करोग निदान मोहीम राबविण्यात येणार असून नागरिकांसाठी मोफत तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत कॅन्सर डायग्नोसिस व्हॅनद्वारे मुख, स्तन व गर्भाशयमुख कर्करोगाच्या संशयित रुग्णांची तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात येणार आहे. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ही मोहीम राबविण्यात येत असून उच्च रक्तदाब, मधुमेह, स्ट्रोक, हृदयरोग तसेच विविध प्रकारच्या कर्करोगांचे निदान व उपचार सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये करण्यात येतात. यवतमाळ जिल्ह्यात हा कार्यक्रम सन २०१८ पासून प्रभावीपणे सुरू आहे. याच अंतर्गत जिल्ह्यासाठी विशेष कॅन्सर निदान व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या व्हॅनद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रावर तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. शिबिरामध्ये स्त्रीरोग तज्ञ व दंत शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली मुख, स्तन व गर्भाशयमुख कर्करोगाची तपासणी केली जाईल. तपासणीदरम्यान संशयित आढळलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी योग्य मार्गदर्शन व संदर्भ सेवा उपलब्...

डिजिटल जनगणनेत नागरिकांनाही स्व-गणना करता येणार

> १ मे पासून ऑनलाईन माहिती भरण्याची सुविधा ; > नागरिकांनी स्व-गणना सुविधेचा लाभ घ्यावा ; > जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आवाहन यवतमाळ, दि. २३ : भारताच्या १६ व्या जनगणनेचे कामकाज सुरु झाले असून राज्यात १ मे पासून डिजिटल जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात होणार आहे. त्याअंतर्गत शासनाने नागरिकांसाठी स्व-गणनेची सुविधा उपलब्ध करुन दिली असून नागरिकांनी आपल्या मोबाईलवरून स्व-गणना करुन राष्ट्रीय कार्यात सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे. या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात १ ते १५ मे या कालावधीत नागरिकांना ऑनलाईनरित्या स्व-गणना करता येणार असून या स्व-गणनेत नागरिकांना स्वत:सह कुटुंबांची माहिती भरता येणार आहे. त्यासाठी भारत सरकारच्या https://se.census.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून आपल्या मोबाईल क्रमांकाद्वारे लॅागीन करावे. त्यानंतर जिओ लोकेशन समाविष्ट करुन कुटुंबाबाबत विचारण्यात येणाऱ्या सर्व प्रश्नांची माहिती भरणे आवश्यक आहे. ही माहिती भरल्यानंतर त्याचा ११ अंकी एसई क्रमांक तयार झाल्यानंतर तो जतन करुन ठेवावा. हा...

शेतकरी उत्पादक कंपनी, अशासकीय संस्था व स्वयं-सहाय्यता गटांसाठी ‘संवाद सेतू कार्यशाळा’

Image
जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनी, अशासकीय संस्था व स्वयं-सहाय्यता गट यांच्यासाठी “संवाद सेतू कार्यशाळा” जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना सभागृह येथे बुधवारी उत्साहात संपन्न झाली. जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेत जिल्ह्यातील सुमारे २७० सभासदांनी सक्रिय सहभाग नोंदविला. या कार्यशाळेचे आयोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा मनोजकुमार ढगे, प्रकल्प उपसंचालक व्यंकट कुंतावर यांनी केले होते. कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट विविध विभागांमधील समन्वय वाढवून शेतकरी गटांना शासकीय योजनांची माहिती व लाभ अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देणे हे होते. कार्यक्रमादरम्यान कृषी विभागाच्या विविध योजनांचे सादरीकरण मनोजकुमार ढगे यांनी केले. कृषी संलग्न विविध विभागांतील विभाग प्रमुखांनी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यामध्ये पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, रेशीम, कृषी पर्यटन, महाउर्जा, नाबार्ड, जिल्हा अग्रणी बँक, कृषी विज्ञान केंद्र तसेच शेतमाल खरेदी करणारी कंपनी रुपीया फिनोव्हेशन प्रा. लि. यांचा समावेश होता. संबंधित तज्ज्ञांनी विविध योजनांची माहिती, वित्तीय सहा...

जिल्हाधिकाऱ्यांकडून क्रीडा सुविधा निर्मितीचा आढाव

Image
जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक संपन्न जिल्हयात क्रीडा सुविधा निर्मितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल समितीची आढावा सभा बुधवारी संपन्न झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी क्रीडा सुविधा निर्मितीचा आढावा घेतला. यात आझाद मैदान येथील जलतरण तलाव दुरुस्ती, फिल्टर प्लांट, सिंथेटिक हॅंन्डबॅाल मैदान, दुकान बांधकाम, ॲस्ट्रो टर्फ हॉकी मैदान इ. कामांबाबत आढावा घेवून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी दर्जेदार कामे झाली पाहिजेत, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. या बैठकीला जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, क्रीडा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जिल्हा क्रीडा संकुल भेट देवून प्रस्तावित कामांच्या जागेची पाहणी करुन आवश्यक सुधारणात्मक सूचना दिल्या.