जिल्ह्यात २८ एप्रिलला ‘सेवा हक्क दिन’
शासकीय कार्यालय, ग्रामपंचायतीत कार्यक्रमांचे आयोजन करा
जिल्हाधिकारी विकास मीना यांचे निर्देश
महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या सुचनानुसार २८ एप्रिल हा दिवस “सेवा हक्क दिन” म्हणून साजरा करण्यात येणार असून या दिवशी जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, ग्रामंपचायत स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सर्व विभागांच्या प्रमुखांना दिले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने २८ एप्रिल सेवा हक्क दिवसानिमित् रोजी शासकीय कार्यालयांमध्ये त जनजागृती कार्यक्रम, सेवा बांधिलकी शपथ, अधिनियम व सेवांची माहिती देणे, आदर्श आपले सरकार केंद्राचे उद्घाटन, सेवांची व शुल्कांची माहिती प्रदर्शित करणे, विद्यार्थी, महिला आणि इतर घटकांसमव्त कायद्याविषयी सुसंवाद साधून जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यासोबतच, ग्रामपंचायत स्तरावर विशेष सभेचे आयोजन करणे, ग्रामपंचायत सदस्यांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची माहिती व प्रत देणे, अधिनियमाची माहिती दर्शविणारे फलक लावणे, सेवा व शुल्काची माहिती देणे, तक्रारींसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये क्यू आर कोड लावणे, आपले सरकार सेवा केंद्रामार्फत अधिसूचित ऑनलाईन सेवा नागरिकांना उपलब्ध करुन देणे, ग्रामपंचायत स्तरावर आदर्श आपले सरकार सेवा केंद्राचा उद्घाटन समारंभ आयोजित करणे इ. निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले आहेत.
नागरिकांना या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
Comments
Post a Comment