हत्तीरोग निर्मूलनासाठी टीएएस मोहिमेचे उद्घाटन

हत्तीरोग संक्रमण तपासणी व पडताळणी होणार यवतमाळ, दि.10 (जिमाका) : हत्तीरोग संक्रमण तपासणी व पडताळणी टीएएस २०२६ मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. नागरी आरोग्य केंद्र क्र. २, वंजारी फैल अंतर्गत स्वर्गीय विष्णुपंत उगलमुगले नगरपरिषद शाळा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच हत्तीरोग निर्मूलनाचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. क्रांतीकुमार नावंदीकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. तनवीर शेख, जागतिक आरोग्य संघटनेचे डब्ल्यूएचओ डॉ. समाधान देबाजे, ग्रामीण रुग्णालय कळंबचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर मडावी, नगरपरिषद प्रशासन अधिकारी, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. २ यूपीएचसी च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नाझिया काझी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमती सेंगर, तसेच डॉ. विनोद डवले आणि केंद्र प्रमुख डॉ. विलास काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान डॉ. नाझिया काझी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी हत्तीरोगाचा प्रसार कसा होतो, त्याची लक्षणे कोणती आहेत आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत, याबाबत तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. या मोहिमेत ‘आरोग्य शिक्षण’ हा महत्त्वाचा घटक ठरला. या मोहिमेच्या यशस्वी आयोजनासाठी नागरी आरोग्य केंद्र वंजारी फैल येथील कर्मचारी विद्या केळकर, वानखडे, पद्मा मेश्राम, आरती राठोड आणि अभिजीत दोडके यांनी परिश्रम घेतले. तसेच आशा सेविका, शाळेचे मुख्याध्यापक कंवर आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. ए. पिसे यांनी केले. हत्तीरोगमुक्त जिल्हा निर्माण करण्यासाठी नागरिकांनी व पालकांनी अशा मोहिमांना सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांनी यावेळी केले.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित