आला उन्हाळा तब्येत सांभाळा !

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आवाहन वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे सध्या पृथ्वीचे तापमान वाढते आहे. मार्च महिन्यापासूनच राज्यातील अनेक भागात तापमान वाढत आहे. अशा परिस्थितीत नागरीकांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. सुभाष ढोले यांनी केले आहे. सर्व साधारणपणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान तीन डिग्री सेल्सिअसने जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट असे म्हटले जाते. सलग दोन दिवस तापमान ४५ डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असेल तर त्या भागात उष्णतेची लाट आली असे म्हटले जाते. एप्रिल, मे व जुन या महिन्यात उष्माघाताचा प्रादुर्भाव अधिक असतो. तसेच त्यामुळे मृत्युही होण्याची शक्यता असते. अशा वेळी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक, वृध्दलोक व लहान मुले, गरोदर महिला, स्थुललोक, पुरेशी झोप न झालेली लोक, मधुमेह, हृदयविकार, दारुचे व्यसन असणारे लोक, घट्ट कपडे घातलेले लोक, निराश्रित, घरदार नसलेले गरीब लोक, कारखान्यात बॉयलर जवळ काम करणारे लोक अशा प्रत्यक्ष उष्णतेशी संबंध येणाऱ्यांना उष्माघात होतो. वरील अतिजोखमीच्या लोकांनी उष्णतेच्या लाटेसंदर्भात विशेष काळजी घेतली पाहिजे. उष्णतेमुळे होणारा शारीरीक त्रास किरकोळ स्वरुपाचा किंवा गंभीर स्वरुपाचा असतो, असे ते म्हणाले. थकवा येणे, ताप येणे, शरीरावर रॅश उमटणे, हातापायांना गोळे येणे, चक्कर येणे, त्वचा कोरडी पडणे, डोके दुखणे रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी व अस्वस्थता ही लक्षण आहेत. याकरीता प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत. यात पुरेसे पाणी प्यावे, प्रवासात पाणी सोबत ठेवावे, हलक्या वजनाचे, सैलसर कपडे वापरा, गॉगल, छत्री, टोपी व पादत्राणे वापरणे, पंखा, कुलरच्या मदतीने घर थंड ठेवावे, उन्हात जाण्यापुर्वी सनस्किन क्रिम लावावा, शरबत किंवा जलसंजीवनीचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी, डॉ. टि.ए. शेख, जिल्हा साथरोग अधिकारी, डॉ. स्मिता पेटकर, जिल्हा साथरोग तज्ञ, डॉ. निलेश लिडे यांनी केलेले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …