यवतमाळ महोत्सवाचा दिमाखात समारोप
इंडियन आयडॉल फेम अभिजित सावंत यांच्या गाण्यांनी जिंकली प्रेक्षकांची मनं
महोत्सवातील विविध प्रदर्शनीतून सुमारे अडीच कोटींची उलाढाल
सांस्कृतिक कार्यक्रमाला भरगच्च गर्दी
यवतमाळ, दि.१ (जिमाका) : राज्य शासनाच्या विविध जिल्हास्तरीय विभागांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'यवतमाळ महोत्सव २०२६' दिमाखात समारोप करण्यात आला. या महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात इंडियन आयडॉल फेम प्रसिद्ध गायक अभिजित सावंत यांच्या गीतगायनाने रंगत आणली.
या कार्यक्रमाला नगराध्यक्षा ॲड प्रियदर्शनी उईके, जिल्हाधिकारी विकास मीना, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कविता महाजन, तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, मुख्याधिकारी शुभम क्यातमवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या यवतमाळ महोत्सवात भरविण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनी, उमेदच्या समृद्धी मिनी सरस प्रदर्शनी आणि माविमच्या नवतेजस्विनी प्रदर्शनीत कालपर्यंत जवळपास अडीच कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती मा जिल्हाधिकारी विकास मीना यांनी समारोपीय भाषणात दिली.
या समारोपीय कार्यक्रमात यवतमाळ महोत्सवात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, पशु संवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ या विभागामार्फत कृषी उत्पादक कंपन्या, ग्रामीण भागातील महिला स्वयं सहायता गटांचे ३०० पेक्षा जास्त प्रदर्शन स्टॉल्स व ६० पेक्षा जास्त फूड स्टॉल्स आणि पशु दालन उभारण्यात आले होते. या महोत्सवादरम्यान आयोजित पाक कला स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्टॉल्सधारकांचा नगराध्यक्षा प्रियदर्शनी उईके आणि जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सुरुवातीला बासुरीवादक आकाश सैतवाल यांनी पारंपरिक बासुरीवाद्याने गीताचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या शेवटी, प्रसिद्ध गायक अभिजित सावंत यांच्या जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सत्कार केला.
चौकट
“यवतमाळ महोत्सव सारखा उपक्रम पहिल्यांदाच झालेला आहे. पुढील काळातही यवतमाळकरांना अपेक्षित असे महोत्सव, सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.”नगराध्यक्षा प्रियदर्शनी उईके












Comments
Post a Comment