'युवा संवाद' करिअर मार्गदर्शन सत्र उत्साहात ; विद्यार्थ्यांना मिळाली अभ्यासाची दिशा

जिल्हा प्रशासनामार्फत तरुणांसाठी आयोजित युवा संवाद उपक्रमांतर्गत तहसीलदार हेमकृष्ण पिसदे यांचे मार्गदर्शन सत्र उत्साहपूर्ण वातावरणात आणि विद्यार्थ्यांच्या सहभागात यशस्वीरित्या पार पडले. यावेळी उपजिल्हाधिकारी पूनम अहेरी, मुख्यमंत्री फेलो विठ्ठल गाडगे आणि स्पर्धा परीक्षार्थी उपस्थित होते. तहसीलदारहेमकृष्ण पिसदे यांनी आपल्या संघर्षमय प्रवासातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडत युपीएससी आणि एमपीएससी परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक असलेली माहिती दिली. त्यांनी तयारीदरम्यान येणाऱ्या अडचणी, सातत्याचे महत्त्व तसेच योग्य नियोजन आणि अभ्यासाची परिणामकारक रणनीती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सत्रादरम्यान विद्यार्थ्यांना शालेय पातळीवरील पाठ्यपुस्तकांपासून भक्कम पाया तयार करण्याचे महत्त्व, विषयांचा समन्वय साधत अभ्यास करण्याची पद्धत, सातत्य आणि पुनरावृत्तीची गरज, तसेच आळशीपानाची सवय कशी टाळावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच युपीएससी/एमपीएससी या परीक्षेत दीर्घकालीन आणि शिस्तबद्ध प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळणार असल्याचेही अधोरेखित करण्यात आले. या सत्रातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्पष्ट दिशा, वास्तवाची जाणीव आणि व्यावहारिक रणनीतीचे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक गंगाधर होवाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. 000000 यवतमाळ दि. 27 (जिमाका) : जिल्हा प्रशासनामार्फत तरुणांसाठी आयोजित युवा संवाद उपक्रमांतर्गत तहसीलदार हेमकृष्ण पिसदे यांचे मार्गदर्शन सत्र उत्साहपूर्ण वातावरणात आणि विद्यार्थ्यांच्या सहभागात यशस्वीरित्या पार पडले. यावेळी उपजिल्हाधिकारी पूनम अहेरी, मुख्यमंत्री फेलो विठ्ठल गाडगे आणि स्पर्धा परीक्षार्थी उपस्थित होते. तहसीलदारहेमकृष्ण पिसदे यांनी आपल्या संघर्षमय प्रवासातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडत युपीएससी आणि एमपीएससी परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक असलेली माहिती दिली. त्यांनी तयारीदरम्यान येणाऱ्या अडचणी, सातत्याचे महत्त्व तसेच योग्य नियोजन आणि अभ्यासाची परिणामकारक रणनीती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सत्रादरम्यान विद्यार्थ्यांना शालेय पातळीवरील पाठ्यपुस्तकांपासून भक्कम पाया तयार करण्याचे महत्त्व, विषयांचा समन्वय साधत अभ्यास करण्याची पद्धत, सातत्य आणि पुनरावृत्तीची गरज, तसेच आळशीपानाची सवय कशी टाळावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच युपीएससी/एमपीएससी या परीक्षेत दीर्घकालीन आणि शिस्तबद्ध प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळणार असल्याचेही अधोरेखित करण्यात आले. या सत्रातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्पष्ट दिशा, वास्तवाची जाणीव आणि व्यावहारिक रणनीतीचे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक गंगाधर होवाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. 000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …