जिल्ह्यात लक्षित गटाचे परिवार सर्वेक्षणास बुधवारपासून प्रारंभ

शासनाच्या ‘अमृत’ संस्थेचा अभियान यवतमाळ, दि.7 (जिमाका) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांच्या लक्षित गटातील कुटुंबांची माहिती संकलित करणे, त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे आणि त्या आधारे अधिक परिणामकारक योजना तयार करण्याच्या उद्देशाने “लक्षित गटाचे परिवार सर्वेक्षण” अभियान हाती घेण्यात आले आहे. हे सर्वेक्षण अभियान जिल्ह्यात दि. ८ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानाद्वारे जास्तीत जास्त पात्र कुटुंबांपर्यंत अमृत संस्थेच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती पोहोचविणे तसेच त्यांच्या अभिप्रायाच्या आधारे भविष्यातील योजनांची आखणी करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच, सर्वेक्षणाच्या माध्यमातून भविष्यातील योजना अधिक परिणामकारक व लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), यवतमाळ यांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …