अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्षमता विकासासाठी ‘साधना सप्ताह’

 आयगॉट कर्मयोगीवर ४ तासांचे कोर्स पूर्ण करणे बंधनकारक  ….अन्यथा वेतन नाही  ११६६ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कोर्स पूर्ण यवतमाळ, दि. 9 (जिमाका) : राज्य शासनाच्या निर्देशानुसार २ एप्रिल ते १० एप्रिल या कालावधीत "साधना सप्ताह" आयोजित करण्यात आलेला आहे. या "साधना सप्ताह" अंतर्गत सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कोर्सेसमध्ये सहभागी होऊन निर्धारित कालावधीत किमान ४ कोर्स व ४ तास कोर्स पूर्ण करणे बंधनकारक असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी बुधवारी महसूल भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या "साधना सप्ताह" अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्याच्या क्षमता विकासासाठी आय गॉट कर्मयोगी प्लॅटफॉर्मवरील एकूण ५० विविध प्रशिक्षण कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कोर्सेसमध्ये सहभागी होऊन निर्धारित कालावधीत किमान ४ कोर्स व ४ तास कोर्स पूर्ण करणे बंधनकारक आहे. शासनाच्या प्राप्त परिपत्रकानुसार, "साधना सप्ताह" दरम्यान संबंधित कोर्सेस पूर्ण न करणाऱ्या अथवा निर्देशांचे पालन न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन संबंधित कालावधीसाठी काढण्यात येणार नाही. जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत व अधिनस्त सर्व कार्यालयातील एकूण १५५३ अधिकारी व कर्मचारी यांनी आयगॉट कर्मयोगी प्लॅटफॉर्मवर नोंदणी केलेली आहे. त्यापैकी एकूण ११६६ अधिकारी व कर्मचारी यांनी ४ तासाचे कोर्स पूर्ण केलेले आहे. हा उपक्रम शासनाच्या "कर्मयोगी अभियान" अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासासाठी महत्वपूर्ण असून, सर्वांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यावेळी केले.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान