'गावस्तरावरील कृषी अवजारे बँक' स्थापनेसाठी २५ एप्रिलपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ

यवतमाळ,दि. ६ (जिमाका) : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) 'गावस्तरावरील कृषी अवजारे बँक' स्थापन करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. आता पात्र महिला बचत गट आणि महिला गाव संघ यांना २५ एप्रिल २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करता येणार आहेत. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम मुदत ५ एप्रिल २०२६ पर्यंत होती. मात्र, प्रकल्प गावांतील 'उमेद' आणि 'माविम' पुरस्कृत महिला बचत गट तसेच महिला गाव संघांचा सहभाग वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अर्ज कोणाला करता येईल? प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या गावांतील नोंदणीकृत महिला बचत गट आणि महिला गाव संघ या योजनेसाठी पात्र आहेत. निवड प्रक्रिया: एका गावातून एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास, लाभार्थी गटाची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने केली जाईल. जिल्हास्तरीय मेळावे: १५ एप्रिल २०२६ पर्यंत जिल्हास्तरावर विशेष मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. या मेळाव्यांमध्ये बँक प्रतिनिधींच्या उपस्थितीत कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन केले जाईल. या योजनेचा जास्तीत जास्त महिला शेतकरी गटांना लाभ द्यावा, असे आदेश प्रकल्प संचालक परिमल सिंह यांनी दिले आहेत. या योजनेसंदर्भात इच्छुक गटांनी अधिक माहितीसाठी आपल्या संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किंवा 'आत्मा' कार्यालयाशी संपर्क साधावा, प्रकल्प संचालक (पोकरा) यांनी केले आहे. ०००० --

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …