Posts

Showing posts from 2026

राज्यातील भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी अमरावती विभागातून सूचना व अभिप्राय मागविण्याबाबत आवाहन

  विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी व नागरिकांना सक्रिय सहभागाचे आवाहन             यवतमाळ, दि. 8 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी तसेच परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे.           या समितीच्या कार्यकक्षेनुसार राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, तज्ज्ञ व इतर संबंधित हितधारकांशी चर्चा करून भरती परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासाठी सूचना, शिफारशी, हरकती व अभिप्राय प्राप्त करून घेतले जाणार आहेत.           अमरावती विभागातील संबंधित हि...

खा. संजय देशमुख यांनी घेतला केंद्र शासनाच्या योजनांचा सखोल आढावा

   दिशा समितीची चार तास आढावा बैठक             यवतमाळ, दि. 8 (जिमाका) : जिल्ह्यात केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणी व प्रगतीच सखोल आढावा दिशा जिल्हा विकास व सनियंत्रण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात समितीचे अध्यक्ष तथा खासदार संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सुमारे चार तास ही बैठक झाली.             या बैठकीस आमदार बाळासाहेब मांगुळकर, आमदार संजय देरकर, आमदार किसनराव वानखेडे, समितीचे सचिव तथा जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल खत्री, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी रेवैयाह डोंगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, प्रकल्प संचालक आनंदराव पिंजले तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.             बैठकीत कृषी विभाग, पीक विमा योजना, महावितरण, शिक्षण, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय महा...

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय परिक्षा पध्दतींचा अभ्यास करुन सुधारणा सुचविणार राज्यातील भरती परिक्षांसाठी उच्चस्तरीय समिती गठित

  यवतमाळ, दि. 8 (जिमाका) : राज्य शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या भरती परीक्षा अधिक पारदर्शक ,   सुरक्षित ,   विश्वासार्ह ,   निष्पक्ष आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी विद्यमान परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्याकरिता उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.    मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 12 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या बैठकीत राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचे संपूर्ण पुनर्विलोकन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) श्रीमती व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.   समितीमध्ये पोलीस महासंचालक सदानंद दाते ,   इलेक्ट्रॉनिक्स ,   माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह ,   नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम ,   संघ लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य एअर मार्शल अजित शंकरराव भोसले (सेवानिवृत्त) आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) ,   ...

जिल्हाधिकारी कार्यालयात नवीन वाहन भाडेतत्त्वावर घेण्यासाठी निविदा

  यवतमाळ, दि. 7 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सध्या उपलब्ध असलेल्या वाहनाचे कंत्राट संपुष्टात आल्याने नवीन वाहन भाडेतत्त्वावर घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार वातानुकूलित टॅक्सी परवाना असलेले इनोव्हा हायक्रॉस/हायब्रिड व्हीएक्स ७ एस मॉडेल प्रकारातील वाहन भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे. वाहन भाड्याने घेण्यासंदर्भातील इतर अटी व शर्ती कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचना फलकावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. इच्छुक वाहनधारकांनी १७ सप्टेंबरपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांच्या कार्यालयात सिलबंद लिफाफ्यात निविदा सादर करावी. प्राप्त सिलबंद निविदा २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता उघडण्यात येणार आहेत. इच्छुक वाहनधारकांनी निर्धारित मुदतीत निविदा सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.

निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ अॅप ९ सप्टेंबरला कार्यशाळेचे आयोजन

  यवतमाळ दि. 7 (जिमाका):  यवतमाळ कोषागारामधून निवृत्तीवेतन अथवा कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य शासनाच्या सर्व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी ’ ॲप कार्यान्वित करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा बुधवार, ९ सप्टेंबर  रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत बळीराजा चेतना भवन बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील   सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी कार्यशाळेस प्रत्यक्ष उपस्थित राहावे. ‘महा-उपलब्धी ’ ॲप कार्यान्वित करताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करून घेण्यासाठी या कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांनी केले आहे. ‘महा-उपलब्धी ’ अॅपमध्ये हयातीचा दाखल्याची सुविधा             ‘महा-उपलब्धी ’ ॲपमध्ये हयातीच्या दाखल्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी यवतमाळ कोषागारामधून निवृत्तीवेतन अथवा कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांनी संबंधित बँकेमध्ये आपली ई-केवायसीची कार्यवाह...

राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी विकास मंत्र्यांचे अभिवादन

Image
  यवतमाळ दि. 7 (जिमाका):   आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त आज आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात   त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आले. यावेळी आमदार राजु तोडसाम, जिल्हाधिकारी विकास मिना यांनीही राजे उमाजी नाईक यांना पुष्प वाहून अभिवादन केले .

आदिवासी विद्यार्थी व बेरोजगार युवकांचे बेमुदत आंदोलन स्थगित आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या मध्यस्थीला यश

Image
   आंदोलकांच्या विविध मागण्या मान्य ; अडीअडचणींबाबत मुख्य सचिवांकडे १५ सप्टेंबरला बैठक यवतमाळ दि.   7   (जिमाका):   आदिवासींची विशेष पदभरती आणि विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर सुरु असलेल्या आदिवासी विद्यार्थी व बेरोजगार युवकांचे बेमुदत आंदोलन आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या मध्यस्थीने स्थगित करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण, ग्रामविकास, आरोग्य यासह विविध विभागातील व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, वन इ. विभागातील पेसा नॅान पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती   प्रवर्गाच्या पदभरतीसंदर्भात आदिवासी विद्यार्थी व बेरोजगार युवकांचे आंदोलन सुरु होते. या आंदोलनाची शासनाने दखल घेत त्यांच्या पदभरतीच्या मागण्यासंदर्भात आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेतली. या बैठकीत अनुसूचित जमाती प्रवर्गाची पदभरती सहा महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानंतर आज (दि.७) रोजी आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, जिल्हाधिकारी विका...

खासदार संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दिशा समिती सभा

            यवतमाळ, दि.   7   (जिमाका) : जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) चे अध्यक्ष यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाचे खासदार संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची सभा मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.             ही सभा कै. वसंतराव नाईक जिल्हा परिषद सभागृह, यवतमाळ येथे होणार आहे. या सभेत केंद्र शासनाच्या विविध योजनांविषयी आढावा घेतला जाणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, यवतमाळ यांनी दिली आहे.

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पुर्ततेसाठी १० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

  यवतमाळ, दि. 4 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या ऑनलाइन अर्जांपैकी सेंड बॅक करण्यात आलेल्या ऑनलाइन अर्जांतील त्रुटींची पुर्तता करण्यासाठी १० सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.  तसेच, निर्धारित मुदतीत त्रुटींची पूर्तता न करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही आणि ते स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचित राहील, असे समाज कल्याण आयुक्तांनी कळविले आहे.  स्वाधार योजनेकरिता सेंड बॅक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जातील त्रुटींची पूर्तता करून आवश्यक ती सर्व कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करणे आणि अर्ज विहित मुदतीत समाज कल्याण कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी ऑनलाइन अर्ज भरला आहे; मात्र त्याची हार्डकॉपी अद्याप कार्यालयात सादर केलेली नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांनी विहित कालावधीत अर्ज व कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे ते स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांच...

९ सप्टेंबरला डाक जीवन विमा महाअभियान

  डाक सेवक घरोघरी भेट देणार यवतमाळ, दि. 4 (जिमाका) : नागरिकांच्या आर्थिक सुरक्षिततेला अधिकाधिक बळ देण्यासाठी डाक विभागच्या वतीने   जिल्ह्यात ९ सप्टेंबर रोजी डाक जीवन विमा महाअभियान राबविण्यात येणार आहे.   या विशेष अभियानांतर्गत डाक विभागाचे कर्मचारी तसेच ग्रामीण डाक सेवक घरोघरी भेट देऊन नागरिकांना डाक जीवन विमा   आणि ग्रामीण डाक जीवन विमा   योजनांचे महत्त्व समजावून सांगणार आहेत. जीवन विम्याचे महत्त्व, आर्थिक सुरक्षितता, विमा योजनेचे फायदे आणि पुरविण्यात येणाऱ्या सुविधा याची माहिती त्या भेटीच्या माध्यमातून जनतेला देण्यात येणार आहे. ग्रामीण भागामध्ये आजही जीवन विमा योजनेविषयी जागरुकता नसल्यामुळे जनतेमध्ये विमा साक्षरतेचा प्रसार करून आर्थिक स्थैर्य निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे. ग्रामीण भागासोबतच आता शहरी जनतेला सुद्धा ग्रामीण डाक जीवन विम्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे डाक जीवन विम्यापासून वंचित असणाऱ्या जनतेला ग्रामीण डाक विम्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.   आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीचा विमा असणे ही काळाची गरज ...

सरपंच पदाच्या सुधारित आरक्षणाची सोडत ९ सप्टेंबरला

              यवतमाळ, दि. 4 (जिमाका) : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी निश्चित करण्यात आलेले आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यामुळे सरपंच पदाच्या आरक्षणात सुधारणा करण्याबाबत ग्रामविकास विभागाने जिल्हा प्रशासनाला कळविले आहे. त्यानुसार सरपंच पदाच्या सुधारित आरक्षण सोडतीची प्रक्रिया राबविण्यात येणार असून ही आरक्षण सोडत प्रक्रिया ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता संबंधित तहसील कार्यालयाच्या सभागृहात संबंधित तहसीलदार तथा प्राधिकृत अधिकारी यांच्या अधिपत्याखाली होणार आहे. याबाबतची अधिसूचना व आदेश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जारी केले आहे. या सुधारित आरक्षण सोडत प्रक्रियेत दि. १३ जून २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या सरपंच पदाच्या आरक्षणामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही. केवळ नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र) तसेच खुला (सर्वसाधारण) प्रवर्ग, महिलांसह, यांच्या आरक्षणामध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यात येणार आहे. १२ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शुद्धीपत्रकान्वये नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुला प्रवर्ग यांचे ...

यवतमाळ एसटी आगाराच्या ताफ्यात पाच नवीन राजमाता जिजाऊ बस दाखल

Image
   पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते बसचे लोकार्पण यवतमाळ दि.   4   (जिमाका):   यवतमाळ एसटी महामंडळ आगाराच्या ताफ्यात पाच नवीन राजमाता जिजाऊ बस दाखल झाल्या असून पालकमंत्री संजय राठोड आणि आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या हस्ते फित कापून या बसचे लोकार्पण आज शुक्रवारी करण्यात आले. यावेळी त्यांनी या नवीन बसेसची पाहणी करुन सुविधांची माहिती घेतली.   या लोकार्पण कार्यक्रमाला एसटी महामंडळाचे यंत्र अभियंता जयेश पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी दादाराव दराडे, आगार व्यवस्थापक पराग भोपळे, सुरक्षा व दक्षता अधिकारी महेंद्र वानखेडे, वाहतूक निरीक्षक उत्कर्ष मोहाडे, हरिश थोरात यांच्यासह एसटी महामंडळातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

नवाबपूर येथील महावितरणचे ३३ केव्हीचे उपकेंद्र सुरु

Image
      पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन > पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून पाच कोटींचा निधी > ६०० कृषी ग्राहकांना मिळणार योग्य दाबाचा वीजपुरवठा             यवतमाळ, दि.   4   (जिमाका) : नेर तालुक्यातील नवाबपूर येथील महावितरणचे ३३/११ केव्हीचे उपकेंद्र कार्यान्वित झाले असून गुरुवारी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते या उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले. पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने जिल्हा वार्षिक योजनेतून मिळालेल्या पाच कोटींच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या उपकेंद्रामुळे परिसरातील सुमारे ६०० कृषी वीज ग्राहकांना लाभ मिळणार आहे.             यापूर्वी बानगाव, चिचगाव, फत्तेपूर व उदापूर या गावांमधील कृषी पंपांची संख्या आणि विद्युत भार वाढल्यामुळे शिरजगाव उपकेंद्रावर मोठ्या प्रमाणात भार निर्माण झाला होता. परिणामी या गावांमधील कृषी ग्राहकांना अपेक्षित व योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळण्यात अडचणी निर्माण होत होत्या.     ...