ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

 यवतमाळ, दि. 16 (जिमाका) : जिल्ह्यातील बिगर व अंशत:अनुसूचित क्षेत्रातील सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या तसेच सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे तयार करण्यात येणाऱ्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

या निवडणुकांसाठी १५ एप्रिल २०२६ हा मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक निश्चित करण्यात आला आहे.

कार्यक्रमानुसार, २४ जुलै  रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर नागरिकांना २४ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत.

प्राप्त हरकती व सूचनांची छाननी करून ४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मतदारांनी प्रारूप यादीमध्ये आपले नाव, पत्ता व इतर तपशील तपासून आवश्यक असल्यास विहित मुदतीत हरकती अथवा सूचना सादर करण्याचे आवाहन  प्रशासनाने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित