वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 

  विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी विविध कर्ज योजना सुरु

  यवतमाळ, दि. 9 (जिमाका) : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ अंतर्गत तसेच विशेष मागास प्रवर्ग विकास महामंडळाच्या विविध आर्थिक विकास योजनांचा लाभ घेण्यासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी पात्र लाभार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र व्यक्तींनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आधार ताजणे यांनी केले आहे.

  या योजनांमध्ये राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, पैलवान मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ, श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ, ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ, विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ तसेच श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत.

 महामंडळामार्फत वैयक्तिक व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, २५ टक्के बीजभांडवल कर्ज योजना आणि १ लाख रुपयांची थेट कर्ज योजना संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहे. इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.

अर्ज करण्यासाठी vnvjntdc.org अधिकृत संकेतस्थळ ला भेट देता येईल. तसेच अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, पहिला मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पळसवाडी कॅम्प, दक्षता भवनच्या मागे, दारव्हा रोड, यवतमाळ येथे किंवा दूरध्वनी क्रमांक ०७२३२-२९५०११ वर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या यवतमाळ यानी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित