गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती;

                                  Ø अर्ज सादर करण्याची २४ जुलै अंतिम मुदत

            यवतमाळ, दि.13 (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मर्या. सन २०२६ या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच इतर अभ्यासक्रमांमध्ये सरासरी ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे.

 या योजनेअंतर्गत मातंग समाज तसेच तत्सम १२ पोटजातींतील गुणवंत विद्यार्थ्यांची गुणवत्ता व ज्येष्ठतेनुसार निवड करण्यात येणार आहे. प्रत्येक अभ्यासक्रमातून उपलब्ध निधीच्या अधीन राहून प्रथम तीन ते पाच विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.

 मातंग समाज तसेच तत्सम १२ पोटजातींतील मादगी व मादिगा पोटजातीतील पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिष्यवृत्तीसाठी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज करावेत, मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

 इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पळसवाडी कॅम्प, दारव्हा रोड, यवतमाळ येथे दि. २४ जुलै पर्यंत सादर करावेत. असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित