कृषी संलग्न व्यवसाय वृद्धीसाठी ओबीसी महामंडळाचे बिनव्याजी कर्ज
>स्वयंरोजगाराची सुवर्ण संधी
यवतमाळ, दि. ६ : राज्यातील ओबीसी प्रवर्गातील नागरिकांच्या स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी तसेच उच्च शिक्षणासाठी शासनाने बहुजन कल्याण विभागांतर्गत महाराष्ट्र इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची स्थापना केली आहे. या महामंडळामार्फत कृषी संलग्न व्यवसाय वृद्धीसाठी अत्यंत अल्प व्याजदराने तसेच बिनव्याजी दराने कर्ज वितरीत करण्यात येते.
महामंडळाच्या या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी महाराष्ट्रराज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यवतमाळ यांचे कार्यालय, डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलीस वसाहतीच्या मागे, दारव्हा रोड, यवतमाळ तसेच www.msobcfdc.in येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक सुशांत बेजलवार यांनी केला आहे
00000
Comments
Post a Comment