प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अर्जासाठी आजचा शेवटचा दिवस शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पिक विमा काढावा

यवतमाळ दि.३० :- प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२६ मध्ये राष्ट्रीय पिक विमा पोर्टलवर अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे. यावर्षीपासून ज्या कर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा काढायचा आहे त्यांनी संबंधित बँकेतून योजनेत सहभागी होणे बाबतचे घोषणापत्र (ऑप्ट इन) फॉर्म भरून बँकेतून विमा काढणे अपेक्षित आहे. परंतु जर शेतकऱ्यांना आपले सरकार सेतू सुविधा केंद्रातून विमा काढायचा असेल, तर त्यांनी बँकेत योजनेत सहभागी न होणेबाबतचे घोषणापत्र (ऑप्ट आउट) फॉर्म भरून तो सीएससी, व्हीएलई केंद्र चालकाकडे देऊन विमा काढता येतो. सध्या पोर्टलवर पिक विमा काढतांना प्रादेशिक ग्रामीण बँक किंवा सहकारी बँकेकडून पिक विमा काढावयाच्या पिकासाठी कर्ज घेतलेले नाही व विमा पॉलीसी रद्द करणे किंवा कोणताही लाभ, भरपाई रोखून धरणे योग्य राहील,यास मी सहमती देतो तसेच याबाबत मी कोणताही आक्षेप, तक्रार किंवा दावा करणार नाही, असा संदेश येत आहे. भविष्यात आपला अर्ज कंपनीमार्फत नाकारण्यात येणार नसून अशा वेळी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पिक विमा काढावा. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण ७० हजार ४४४ शेतकरी अर्ज प्राप्त झाले आहे. यावर्षी अल निनोचे सावट असून पिकाच्या उत्पन्नात घट झाल्यास शेतकऱ्यांना पिकांसाठी विमा कवच असणे आवश्यक आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अंतिम दिनांकापूर्वी पिक विमा काढावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. मनोजकुमार ढगे यांनी केले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान