नेर तालुक्यातील 1 हजार 587 शेतकऱ्यांची कर्जमुक्ती यादी जाहीर

यवतमाळ दि. २८ : महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी " पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६" अंतर्गत नेर तालुक्यातील १ हजार ५८७ पात्र शेतकऱ्यांची लाभार्थी यादी संबंधीत ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था, बँक शाखा व कार्यालयामार्फत सार्वजनिक रित्या प्रसिध्द करण्यात आली आहे. याव्दारे लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील सेवा सोसायटी किंवा संबंधित बँक शाखेमध्ये प्रत्यक्ष जाऊन प्रसिध्द झालेली यादी तपासावी आणि आपले आधार प्रमाणीकरण तात्काळ पुर्ण करावे असे आवाहन सहकार विभागामार्फत करण्यात येत आहे. वेळेत प्रमाणीकरण न झाल्यास कर्जमुक्तीच्या पुढील प्रक्रियेत तांत्रीक अडचणी होऊ शकतात. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीसाठी संबंधित सहकारी संस्था, बँकेशी व सहकार अधिकारी श्रेणी-१, सहकारी संस्था, नेर या कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच नेर तालुक्यातील ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सचिव, संबंधित बँकाचे शाखा व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनीही पुढाकार घेऊन लाभार्थ्यांशी संपर्क साधावा आणि त्यांचे आधार प्रमाणीकरण विहीत कालावधीत पूर्ण करून घेण्यासाठी विशेष सहकार्य करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. 000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित