प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेतील गावांच्या सरंपच/सचिवांना ग्राम विकास आराखडा तयार करण्याचे प्रशिक्षण
यवतमाळ, दि. 6 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील सन 2018-19 ते 2025-26 मध्ये 41 गावांची निवड करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने आज दि.6 जुलै रोजी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मंगला मुन यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम पंचायतमधील सरपंच/सचिव यांची सभा संपन्न झाली.
या सभेमध्ये उपस्थित सरंपच/सचिव व कॅम्पुटर ऑपरेटर यांना प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेचे प्रपत्र 1 ते 8 व ग्राम विकास आराखडा तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच प्रत्येक गावांचा युजर आयडी व पासवर्ड तयार करण्यात आले असून, त्याची माहिती संबंधित ग्राम विकास अधिकारी यांना अवगत करण्यात आली.
तसेच या प्रशिक्षण वर्गामध्ये प्रपत्र 1,2,3 अ व 3 ब आणि प्रपत्र 4 भरण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणास सहाय्यक आयुक्त मंगला मून, प्रशांत विष्णू साठे व निवड झालेल्या 41 गावांचे सरपंच/सचिव व संगणक ऑपरेटर उपस्थित होते.
0000

.jpeg)
Comments
Post a Comment