ई-केवायसी न केल्यास पीएम किसानचा हप्ता रखडणार

९७ हजार लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी करुन घ्यावी जिल्हाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन यवतमाळ, दि.2 (जिमाका) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास आगामी हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात, त्यामुळे शातकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी, विकास मीना व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे. जिल्ह्यात पीएम किसान योजनेचे एकूण ३ लाख ४ हजार १०६ सक्रिय लाभार्थी आहेत. त्यापैकी आतापर्यंत ९७ हजार २१८ लाभार्थ्यांनी वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण केले असून, २ लाख ६ हजार ८८८ लाभार्थ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. ई-केवायसी ३० जूनपर्यंत बंधनकारक करण्यात आली होती. त्यामुळे उर्वरित लाभार्थ्यांनी विलंब न करता ही प्रक्रिया पूर्ण करावी. योजनेतील पारदर्शकता वाढविणे, संभाव्य गळती रोखणे आणि केवळ पात्र व जिवंत लाभार्थ्यांपर्यंतच थेट लाभ पोहोचविणे हा या विशेष मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार २० मे २०२६ पासून जिल्ह्यात ई-केवायसी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. लाभार्थ्यांना ई-केवायसीसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण तसेच फेस ऑथेंटिकेशन चेहरा ओळख या दोन सोप्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वृद्ध, आजारी किंवा हालचालींमध्ये अडचण असलेल्या लाभार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून, ग्रामस्तरीय नोडल अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून देत आहेत. जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करून पीएम किसान योजनेचा आगामी हप्ता अखंडितपणे मिळवावा, असे आवाहन केले आहे. तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे आर्णी : 20,016 सक्रिय लाभार्थी, 6,340 ई-केवायसी पूर्ण, 13,676 प्रलंबित. बाभूळगाव : 13,435 सक्रिय लाभार्थी, 3,930 पूर्ण, 9,505 प्रलंबित.दारव्हा : 25,056 सक्रिय लाभार्थी, 7,608 पूर्ण, 17,448 प्रलंबित. दिग्रस : 16,252 सक्रिय लाभार्थी, 3,756 पूर्ण, 12,496 प्रलंबित. घाटंजी : 19,203 सक्रिय लाभार्थी, 6,578 पूर्ण, 12,625 प्रलंबित. कळंब : 13,656 सक्रिय लाभार्थी, 3,858 पूर्ण, 9,798 प्रलंबित. केळापूर : 16,231 सक्रिय लाभार्थी, 4,164 पूर्ण, 12,067 प्रलंबित. महागाव : 25,159 सक्रिय लाभार्थी, 10,448 पूर्ण, 14,711 प्रलंबित. मारेगाव : 13,167 सक्रिय लाभार्थी, 3,783 पूर्ण, 9,384 प्रलंबित. नेर : 18,762 सक्रिय लाभार्थी, 5,974 पूर्ण, 12,788 प्रलंबित. पुसद : 32,351 सक्रिय लाभार्थी, 9,702 पूर्ण, 22,649 प्रलंबित.राळेगाव : 16,451 सक्रिय लाभार्थी, 4,887 पूर्ण, 11,564 प्रलंबित. उमरखेड : 27,171 सक्रिय लाभार्थी, 12,348 पूर्ण, 14,823 प्रलंबित. वणी : 18,635 सक्रिय लाभार्थी, 5,380 पूर्ण, 13,255 प्रलंबित. यवतमाळ : 16,154 सक्रिय लाभार्थी, 4,600 पूर्ण, 11,554 प्रलंबित. झरी-जामणी : 12,407 सक्रिय लाभार्थी, 3,303 पूर्ण, 9,104 प्रलंबित.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान