जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त १५ जुलै रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
यवतमाळ, दि.13 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अंतर्गत मॉडेल करिअर सेंटर तसेच विद्या भवन कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड रिसर्च, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त १५ जुलै रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा रोजगार मेळावा विद्या भवन कॉलेज ऑफ
मॅनेजमेंट अॅन्ड रिसर्च, यवतमाळ येथे होणार आहे. रोजगार मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे
विभागामार्फत राबविण्यात येणारी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि प्रधानमंत्री
इंटर्नशिप योजना यांसह विविध खासगी आस्थापनांमधील रिक्त पदांसाठी प्रत्यक्ष मुलाखतींचे
आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्यात सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह
सोसायटी, यवतमाळ, केरॉस सिक्युरिटी हेल्थ अॅन्ड कंपोझिट सर्व्हिसेस प्रा. लि. तसेच
जय अॅग्रो इंडस्ट्रीज, एमआयडीसी, यवतमाळ या आस्थापनांमध्ये एकूण १७८ रिक्त पदांसाठी
मुलाखती होणार आहेत.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत
रेमंड युको डेनिम प्रा. लि., हिराचंद मुनोत मल्टीस्पेशालिटी-क्रिटिकेअर हॉस्पिटल, यवतमाळ,
मेडिकेअर मल्टी हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर प्रा. लि., पुसद, अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक
प्रा. लि., अमोलकचंद महाविद्यालय, गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय, उमरखेड तसेच
दाते कला व वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे १५३ जागांसाठी मुलाखती घेण्यात येणार
आहेत.
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत चोलामंडलम
इन्व्हेस्टमेंट अॅन्ड फायनान्स कंपनी लि., यवतमाळ शाखा आणि एचडीएफसी बँक लि. येथे ७
जागांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. अशाप्रकारे विविध आस्थापनांमध्ये एकूण
३३८ रिक्त पदांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मेळाव्यात बीडीओ, बीडीई, आरओ-कासा/व्हीओ,
सुरक्षा रक्षक, सुरक्षा सुपरवायझर, इलेक्ट्रिशियन, सेल्समन, ट्रॅक्टर मेकॅनिक, मुख्यमंत्री
युवा कार्य प्रशिक्षणार्थी तसेच प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत विविध पदांसाठी
भरती केली जाणार आहे. या पदांसाठी १० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा, एएनएम, जीएनएम,
बीएससी नर्सिंग, बी.फार्म, डी.फार्म, ओटी टेक्निशियन, डीएमएलटी, बीएससी, एमएससी, बी.कॉम,
एम.कॉम, डी.एड., बी.एड., एम.एड., एमबीए, बीएससी, एमएससी, आदी शैक्षणिक पात्रता आवश्यक
आहे.
जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील
तरुण-तरुणी, अल्पसंख्याक उमेदवार तसेच सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या रोजगार
मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्र, यवतमाळचे सहायक आयुक्त सुशील उचले यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी ०७२३२-२४४३९५
या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment