Posts

Showing posts from July, 2026

आपत्ती निवारणासाठी प्रशासन अलर्ट ; पूरप्रवण भागांसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Image
> दारव्ह्यातील दहेली येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांची तातडीची बैठक > आपत्ती व्यवस्थापन उपाययोजनांचा घेतला आढावा यवतमाळ, दि. ३१ : दारव्हा तालुक्यातील दहेली येथील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती वायवस्थापनाच्या अनुषंगाने पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाची तातडीची आढावा बैठक घेत आपत्ती व्यवस्थापनासाठी तत्काळ उपाययोजना करुन सतर्क राहण्याचे तसेच पूरप्रवण भागांसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. दारव्ह्यातील दहेली दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी अनिल खडांगळे, जिल्हा पोलिस अधिक्षक कुमार चिंता, निवासी उप्पजिल्हाधिकारी अनिरुध्द बक्षी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मुन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे आदी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच पालकमंत्री संजय राठोड यां...

खरीप हंगाम पीक स्पर्धेत ५ ते ५० हजार रुपयांपर्यंत बक्षीसे शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

यवतमाळ दि. 29 : अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा सन २०२६-२७ साठी राज्यस्तरावरून कृषी विभागामार्फत खरीप पीकस्पर्धा जाहीर करण्यात येत आहेत. पिकस्पर्धेचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन संगणक प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेअंतर्गत खरीप हंगाम मधील एकूण ११ पिकांसाठी स्पर्धा घेतली जाणार असून तालुका, जिल्हा व राज्य या तीन स्तरांवर स्पर्धकांची निवड होणार आहे. पिकस्पर्धेतील भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल ही खरीप पीके आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थ्यांच्या स्वतःच्या शेतावर भात पिकासाठी किमान २० गुंठे तसेच उर्वरित पिकांसाठ...

"कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिंक छळ प्रतिबंधक कायदा विषयी" शिबीर संपन्न

Image
यवतमाळ दि. ३० : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने दि. २८ जुलै रोजी "कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिंक छळ" या विषयावर कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे तर प्रमुख वक्ते म्हणुन अभिषेक मेमोरियल फाउंडेशनच्या सचिव प्राचार्य डॉ. सुप्रभा यादगिरवार आणि पॅनल वकील सोनाली भोयर यावेळी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. सुप्रभा यादगिरवार, यांनी कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी भारत सरकारने "कामाच्या ठिकाणी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध, प्रतिबंध आणि निवारण अधिनियम, २०१३ लागू केला आहे. या कायद्याचा उद्देश प्रत्येक महिलेला कार्यालयात सुरक्षित, सन्मानजनक आणि समतावादी वातावरण मिळवून देणे तसेच लैंगिक छळाच्या घटनांना प्रतिबंध व निवारण करणे आहे. तसेच पॅाश कायद्यानुसार कुठल्याही प्रकारचे अवांछित शारीरिक स्पर्श, लैंगिक स्वरूपाची मागणी किंवा सूचक विनोद, अश्लील दृश्ये, आक्षेपार्ह वर्तन हे लैंगिक छळ म्हणून गणल...

दत्तापुर येथे आदिवासी संस्कृतीचे जतन, सवर्धन व लाभार्थ्याच्या मेळाव्याचे आयोजन क्रांतीवीर शामादादा कोलाम यांच्या २७ व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

यवतमाळ दि.३० एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा क्रांतीवीर शामादादा कोलाम संघटना मर्या. यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीवीर आदिवासी जननायक शामादादा कोलाम यांच्या २७ व्या पुण्यतिथीनिमित्त आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच लाभार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता दत्तापूर (निरंजन माहूर), ता. कळंब, जि यवतमाळ येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे राहणार असून आदिवासी विकासमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्यमंत्री इंद्रनोल नाईक हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमास लोकसभा सदस्य, विधानपरिषद व विधानसभा सदस्य, जिल्हाधिकारी, आदिवासी विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस प्रशासनातील अधिकारी तसेच विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमामध्ये आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक परंपरेच जतन, लोककला, लोकसंगीत. लोकनृत्य. हस्तकला, खाद्यसंस्कृती. व रानभाजी महोत्सव तसेच स...

प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अर्जासाठी आजचा शेवटचा दिवस शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पिक विमा काढावा

यवतमाळ दि.३० :- प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२६ मध्ये राष्ट्रीय पिक विमा पोर्टलवर अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे. यावर्षीपासून ज्या कर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा काढायचा आहे त्यांनी संबंधित बँकेतून योजनेत सहभागी होणे बाबतचे घोषणापत्र (ऑप्ट इन) फॉर्म भरून बँकेतून विमा काढणे अपेक्षित आहे. परंतु जर शेतकऱ्यांना आपले सरकार सेतू सुविधा केंद्रातून विमा काढायचा असेल, तर त्यांनी बँकेत योजनेत सहभागी न होणेबाबतचे घोषणापत्र (ऑप्ट आउट) फॉर्म भरून तो सीएससी, व्हीएलई केंद्र चालकाकडे देऊन विमा काढता येतो. सध्या पोर्टलवर पिक विमा काढतांना प्रादेशिक ग्रामीण बँक किंवा सहकारी बँकेकडून पिक विमा काढावयाच्या पिकासाठी कर्ज घेतलेले नाही व विमा पॉलीसी रद्द करणे किंवा कोणताही लाभ, भरपाई रोखून धरणे योग्य राहील,यास मी सहमती देतो तसेच याबाबत मी कोणताही आक्षेप, तक्रार किंवा दावा करणार नाही, असा संदेश येत आहे. भविष्यात आपला अर्ज कंपनीमार्फत नाकारण्यात येणार नसून अशा वेळी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पिक विमा काढावा. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण ७० हजार ४४४ शेतकरी अर्ज प्...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : यादीतील शेतकऱ्यांनी तात्काळ आधार प्रमाणिकरण करावे.

Image
यवतमाळ दि. 28 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ या योजनेची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच राष्ट्रीयीकृत बँकेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. ही यादी ग्रामपंचायत, गावचावडी, सहाय्यक निबंधक, सहकार अधिकारी श्रेणी-१ तालुका ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था, बँका यांचे कार्यालयात, उपलब्ध असुन सर्व पात्र शेतकऱ्यांनी त्यांचे नाव यादीमध्ये असल्याची खात्री करुन नावासमोरील विशिष्ठ क्रमांक, बँकेचे पासबुक, आधार कार्ड, आधार कार्डशी संलग्न मोबाईल यासह जवळचे सेतु सुविधा केंद्रावर जाऊन तात्काळ आधार प्रमाणिकरण करावे. ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले आहे. अशा शेतकऱ्यांचे कर्जखात्यात कर्जमुक्ती लाभाची रक्कम लवकरच शासनामार्फत जमा करण्यात येणार आहे. कर्जमुक्ती योजनेमध्ये पात्र असलेल्या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचे यादीत नाव पाहुन नाव आलेल्या सर्व शेतकऱ्यांनी त्वरीत जवळचे सेतु सुविधा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करावे व कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे. 000

रानभाजी-फळे विक्रेत्यांना १०० टक्के अनुदानावर मिळणार साहित्य रानभाजी-फळे विक्री प्रदर्शन मेळावा ; 30 जुलैपर्यंत अर्ज आमंत्रित

यवतमाळ दि. 28 : स्थानिक आदिवासी फळभाजी विक्रेत्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुसद एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत "रानभाजी, रानफळे विक्री व प्रदर्शन मेळावा" आयोजित करण्यात येणार आहे. प्रकल्प कार्यक्षेत्रातील पुसद, उमरखेड, महागाव, आर्णी, दारव्हा, दिग्रस व नेर या तालुक्यातील आदिवासी विक्रेत्यांना या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. मेळाव्यात सहभागी होणाऱ्या विक्रेत्यांना विक्रीसाठी आवश्यक असणारे स्टॉल, छत्री, वजनकाटा व कॅरेट हे साहित्य शासनाच्या १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रानभाजी महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या इच्छुक आदिवासी राणभाजी विक्रेत्यांनी दि. ३० जुलै २०२६ पर्यंत प्रकल्प कार्यालय, पुसद येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे. 000

शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आधार प्रमाणिकरण करणे अनिवार्य

यवतमाळ दि. 28 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ या योजनेची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच राष्ट्रीयीकृत बँकेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. ही यादी पांढरकवडा तालुक्यातील ग्रामपंचायत, गावचावडी, सहाय्यक निबंधक कार्यालय व ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था, बँका यांचे कार्यालयात, प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी सर्व पात्र शेतकऱ्यांनी त्यांचे नाव यादीमध्ये असल्याची खात्री करुन नावा समोरील विशिष्ठ क्रमांक, बँकेचे पासबुक, आधार कार्ड, आधार कार्डशी संलग्न मोबाईल यासह जवळचे सेतु सुविधा केंद्रावर जाऊन तात्काळ आधार प्रमाणिकरण करावे. ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले आहे. अशा शेतकऱ्यांचे कर्जखात्यात कर्जमुक्ती लाभाची रक्कम लवकरच शासनामार्फत जमा करण्यात येणार आहे. कर्जमुक्ती योजनेमध्ये पात्र असलेल्या पांढरकवडा तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचे यादीत नाव पाहुन नाव आलेल्या सर्व शेतकऱ्यांनी त्वरीत जवळचे सेतु सुविधा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करावे व कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा. असे आवाहन केळापूरचे तहसिलदार व पांढरकवडा सहकार...

अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन

यवतमाळ दि. २८ : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचे स्मृतिप्रित्यर्थ त्यांचे जयंती निमीत्य संपूर्ण महाराष्ट्रात दि. २२ ते दि. २८ जुलैपर्यंत विविध आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यवतमाळ श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत उईके, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेंद्र भुयार आणि जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. उमेश जोगे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माँ जिजाऊ नगर परिषद उच्चप्राथमीक शाळा व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद शाळा येथील सर्व मूलांना त्यांचे पालकांना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची माहिती देण्यात आली तसेच वैयक्तीक स्वछता, संतुलीत आहार, नियीमत व्यायाम, खेळ, संसर्गजन्य आजार मुलांचे लठ्ठपणा, उंची वजन मोजमाप, दृष्टी तपासणी, दंत तपासणी इत्यादी बाबींचे आरोग्य विषयक तपासणी करण्यात आली. तसेच शिबिरा दरम्यान ग्रामीण रुग्णालय कळंब येथेही सर्व्हायकल कॅन्सर, मुख कर्करोग, मधुमेह, हृदयरोग इत्यादी आरोग्य विषयक तपासणी करुन आढळले...

नेर तालुक्यातील 1 हजार 587 शेतकऱ्यांची कर्जमुक्ती यादी जाहीर

यवतमाळ दि. २८ : महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी " पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६" अंतर्गत नेर तालुक्यातील १ हजार ५८७ पात्र शेतकऱ्यांची लाभार्थी यादी संबंधीत ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था, बँक शाखा व कार्यालयामार्फत सार्वजनिक रित्या प्रसिध्द करण्यात आली आहे. याव्दारे लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील सेवा सोसायटी किंवा संबंधित बँक शाखेमध्ये प्रत्यक्ष जाऊन प्रसिध्द झालेली यादी तपासावी आणि आपले आधार प्रमाणीकरण तात्काळ पुर्ण करावे असे आवाहन सहकार विभागामार्फत करण्यात येत आहे. वेळेत प्रमाणीकरण न झाल्यास कर्जमुक्तीच्या पुढील प्रक्रियेत तांत्रीक अडचणी होऊ शकतात. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीसाठी संबंधित सहकारी संस्था, बँकेशी व सहकार अधिकारी श्रेणी-१, सहकारी संस्था, नेर या कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच नेर तालुक्यातील ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सचिव, संबंधित बँकाचे शाखा व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनीही पुढाकार घेऊन लाभार्थ्यांशी संपर्क साधावा आणि त्यांचे आधार प्रमाणीकरण विहीत कालावधीत पूर्ण करून घेण्यासाठी ...

मुख्य जलवाहिनी क्षतीग्रस्त झाल्यामुळे पाणी पुरवठा खंडीत

यवतमाळ, दि. 27 (जिमाका) : पाणी पुरवठा योजनेतंर्गत निळोणा धरणावरुन यवतमाळ शहरास पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी निर्माधीन रेल्वे पुलाखाली दि. 24 जुलै रोजी क्षतीग्रस्त झाल्यामुळे ऑफिसझोन अंतर्गत येणाऱ्या 9.00 लाख लिटर्स, 14.00 लाख लिटर्स व नव्याने बांधकाम करण्यात आलेली 14.00 लाख लिटर्स पाण्याचे टाकीमधून पाणी पुरवठा होणाऱ्या सर्व भागांमधील दि. 24 जुलै पासून पाणी पुरवठा पुर्णपणे बंद आहे. तरी या संदर्भात निर्माणधीन रेल्वे विभागांकडे पत्र व्यवहार करण्यात आला असून पाईप गळती दुरुस्ती करण्याचे काम जलदगतीने करण्यात येत आहे. पाईपलाईन वरील गळती दुरुस्ती होईपर्यंत संबंधीत भागातील पाणी पुरवठा बंद राहील याची कृपया नोंद घेण्यात यावी. असे उपविभागीय अधिकारी एस. आर. उमाळे यांनी नागरीकांना आवाहन केले आहे. 000

3 ऑगस्ट रोजी लोकशाही दिन

यवतमाळ, दि. 27 (जिमाका) : जनतेच्या तक्रारी व समस्या सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येते. त्यानुसार या महिन्याचा जिल्हा लोकशाही दिन दि. 3 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा लोकशाही दिनामध्ये न्याय प्रविष्ट प्रकरणे, राजस्व अपिल प्रकरणे, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे असे स्वीकारण्यात येणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तीक स्वरुपाची नसावी. महिन्यातील तिसऱ्या सोमवारी तालुका स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये अर्जाचे निराकरण न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज सादर करावा. तसेच अर्ज दाखल करतेवेळी तालुका स्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल केल्याची पोच जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये सादर करावी. याशिवाय संबंधित अर्ज स्विकारले जाणार नाही, यांची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी पुनम अहिरे यांनी केले आहे. 000000

"पीएम विश्वकर्मा कर्ज उत्सव" अंतर्गत भव्य पतपुरवठा शिबिर संपन्न Ø लाभार्थ्यांना धनादेशांचे वाटप

Image
यवतमाळ दि. 27 : भारत सरकारच्या 'पीएम विश्वकर्मा योजने' अंतर्गत पारंपारिक कारागिरांचे सक्षमीकरण, वित्तीय समावेशन आणि थेट पतपुरवठा सुलभ करण्याच्या उद्देशाने दि. २३ जुलै २०२६ रोजी राधामंगल कलर्स इन, धामणगाव रोड, यवतमाळ येथे जिल्हास्तरीय भव्य पतपुरवठा शिबिर "पीएम विश्वकर्मा कर्ज उत्सव" यशस्वीपणे पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अंचल प्रमुख अजय कुमार सिंग यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूरच्या एमएसएमईचे संचालक डॉ. विजय शिरसाठ, सहाय्यक संचालक सुभाष इंगेवार, खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अधिकारी जीवन बोथीकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक अतुल इंगळे व अमरावती सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रिय प्रमुख सुनिल पांडे हे उपस्थित होते. शिबिराला विविध बँकेचे अधिकारी व इतर सरकारी विभागाचे अधिकारी सुद्धा हजर होते. कार्यक्रमाची सुरुवात अमरावती सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रिय प्रमुख सुनील पांडे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी या शिबिराचा मुख्य उद्देश स्पष्ट करत स्थानिक कारागिरांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया वचन...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : ५१७३८ लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध

Image
यवतमाळ, दि. 27 : राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५१,७३८ लाभार्थी शेतक-यांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. ही यादी ग्रामपंचायत, गावचावडी, सहाय्यक निबंधक / सहकार अधिकारी श्रेणी-१ तालुका ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था, बँका यांचे कार्यालयात, शेतक-यांना पाहण्यासाठी उपलब्ध असुन योजनेस सर्व पात्र शेतक-यांनी त्यांचे नाव यादीमध्ये असल्याची खात्री करुन नावासमोरील विशिष्ठ क्रमांक, बँकेचे पासबुक, आधार कार्ड, आधार कार्डशी संलग्न मोबाईल यासह जवळचे सेतु सुविधा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करावे. कर्जमुक्ती योजनेस पात्र असणा-या ज्या शेतक-यांची अॅग्रीस्टॅक पोर्टलवर अद्यापही नोंदणी झालेली नाही, अशा शेतक-यांनी कर्जमुक्ती योजनेचे आधार प्रमाणिकरण सुलभतेने होण्यासाठी प्रथम अॅग्रीस्टँक पोर्टलवर तात्काळ नोंदणी करुन घ्यावी. व त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ चे आधार प्रमाणिकरण करावे. यादीमध्ये नाव आलेल्या सर्व पात्र शेतक-यांनी सेतु सुविधा केंद्रावर आधार प्...

तृतीयपंथीयांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल योजना

  यवतमाळ, दि. 24 (जिमाका)   : तृतीयपंथी विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार यांनी तृतीयपंथी व्यक्तींच्या कल्याणासाठीची केंद्रीय क्षेत्र योजना अंतर्गत 'Support for Marginalized Individuals for Livelihood and Enterprise (SMILE ) या छत्र योजनेंतर्गत या उपयोजनेचा समावेश करण्यात आला असून ही योजना केंद्र शासनाच्या https://transgender.dosje.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवरून राबविण्यात येत आहे. योजनेचे निकष, अटी व लाभाचे स्वरूप- शासनमान्य किंवा खासगी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये इयत्ता ०९ वी ते पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणात्या तृतीयपंथी योजनेचा लाभ देण्यात येतो. विद्यार्थी भारताचा नागरीक असावा व त्यांच्याकडे सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या तृतीयपंथी व्यक्तींसाठीच्या राष्ट्रीय पोर्टलवरून जारी करण्यात आलेले तृतीयपंथी ओळख प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.विद्यार्थ्याने https://transgender.dosje.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून, ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. शिष्यवृत्त्यांची संख्या मर्यादित असल्याने, लाभार्थ्यांची निवड मागील शै...

कांदाचाळ व लसूण साठवणूक गृह प्रकल्पासाठी कृषी विभाग देणार ५० टक्के अर्थसहाय्य

  - महाडीबीटी पोटलवर अर्ज करण्याचे आवाहन          यवतमाळ, दि .24   (जिमाका) : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२६-२७ च्या काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत कमी खर्चाचे कांदाचाळ किंवा लसूण साठवणूक गृह उभारणीचा घटक राबविण्यात येत आहे.               राज्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असताना अनेक शेतकरी कांदा जमिनीवर पसरवून किंवा पारंपरिक चाळीत साठवतात, त्यामुळे कांदा सडण्याचे प्रमाण वाढते तसेच गुणवत्तेवर व टिकाऊपणावर विपरीत परिणाम होतो. यासाठी शास्त्रशुद्ध कांदाचाळ उभारणी केल्यास कांद्याची गुणवत्ता टिकून राहते व शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळू शकतो.              एकात्मिक फलोत्पादन विकास    या योजनेअंतर्गत ५ ते २५ मेट्रिक टन, २५ ते ५०० मेट्रिक टन व ५०० ते १००० मेट्रिक टन क्षमतेच्या कांदाचाळ/लसूण साठवणूक गृह उभारणीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. प्रकल्प खर्च ३० लाख रुपयांपेक्षा जास्त ...

संरक्षित शेतीसाठी ५० टक्के अनुदानावर हरीतगृह, शेडनेटगृह

   शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावे  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांचे आवाहन                    यवतमाळ, दि .24   (जिमाका) : कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या संरक्षित शेतीअंतर्गत ५० टक्के अनुदानावर   हरीतगृह,   शेडनेटगृह,   प्लास्टिक मल्चिंग, फळ पिकांसाठी फळांना किंवा फळांच्या घडांना कव्हर, तण नियंत्रण आच्छादन, हायड्रोपोनिक्स व एरोपोनिक्स हे घटक राबविण्यात येत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टलद्वारे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना उच्च प्रतीच्या निर्यातक्षम पिकांसाठी आर्थिक सहाय्य देणे, ग्रामीण युवकांना कृषि आधारित स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे तसेच आधुनिक व उच्च तंत्रज्ञानाच्या साहाय्याने फलोत्पादन क्षेत्राचा विकास साधणे हा आहे. योजनेअंतर्गत विविध घटकांसाठी अनुदानाचे मापदंड निश्चित करण्यात आले आहेत.   हरीतगृह   (ओव्हीपीएच) स...

झरी जामणीतील प्रस्तावित कोळसा खाणीसंदर्भात जनसुनावणी

Image
                                       जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या ग्रामस्थांच्या समस्या             यवतमाळ दि.   24   (जिमाका):   झरी जामणी तालुक्यात मे. नीळकंठ इन्फ्रा मायनिंग लिमिटेड द्वारा प्रस्तावित मार्की-झरी-जामणी-अडकोली कोळसा खाणीसंदर्भात जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणविषयक जाहीर जनसुनावणी अडकोली येथे गुरुवारी पार पडली.             महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक कार्यालय चंद्रपूर यांच्यावतीने आयोजित या जनसुनावणीला उपविभागीय अधिकारी रेवैयाह डोंगरे, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, कंपनीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.                या पर्यावरणीय जनसुनावणीत जिल्हाधिकारी विकास मीना यांनी नागरिकांच्या तक्रारी, समस्या, सूचना जाणून घेतल्या. तसेच त्यातील ग्राह्य सूचनांवर य...
Image
  आकांक्षित तालुक्यांसाठी ‘नीती तारा ’ डिजिटल प्लॅटफॉर्म जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांना क्षमता विकास व अभिमुखता प्रशिक्षण             यवतमाळ दि.   24   (जिमाका): नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील पुसद आणि झरीजामणी या तालुक्यांचा समावेश आहे. या आकांक्षित तालुक्यांत ‘विकसित भारत ’ च्या उद्दिष्टपूर्तीसाठी डेटा-आधारित नियोजन, प्रभावी आढावा आणि रिअल-टाइम कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी नीती आयोगाने ‘नीती तारा ’ हे तंत्रज्ञान-सक्षम प्रशासन सहाय्य व्यासपीठ (टूलकिट) विकसित केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा व तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांसाठी क्षमता विकास व अभिमुखता प्रशिक्षण कार्यक्रम शुक्रवारी, दि. २४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे संपन्न झाला.             या प्रशिक्षण कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विकास मीना, उपविभागीय अधिकारी रेवैयाह डोंगरे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, ...

सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या वाहनांचा ई-लिलाव

  यवतमाळ दि.   24   (जिमाका):   महाराष्ट्र राज्य   सहकारी   आदिवासी    विकास महामंडळ   यवतमाळ कार्यालय अंतर्गत ट्रक वाहनांचा 30 जुलै 2026 रोजी दुपारी 11 ते 5 या वेळेत ई-लिलाव करण्यात येणार आहे.इच्छुकांनी सहभागी होण्याचे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे. ट्रक क्रमांक एम एच १५ ईजी   २०३१ खरेदी वर्ष १८ जुलै २०१४ अनामत रक्कम २५ हजार   ट्रक क्रमांक एम एच १५ ईजी २०३२ खरेदी वर्ष १८ जुलै २०१४ अनामत रक्कम २५ हजार   ट्रक क्रमांक एम एच १५ईजी २०३३ खरेदी वर्ष १८ जुलै २०१४ अनामत रक्कम २५ हजार ट्रक क्रमांक एम एच १५ ईजी   २०३४ खरेदी वर्ष १८ जुलै २०१४ अनामत रक्कम २५ हजार   ट्रक क्रमांक एम एच १५ ईजी २०३५ खरेदी वर्ष १८ जुलै २०१४ अनामत रक्कम २५ हजार   हि वाहने ई-लिलावात विक्रीस ठेवण्यात येत आहेत. एनइएमएल च्या   www.market.neml.in   या पोर्टलवर विक्री करण्यात येत आहे. तेव्हा लिलावाच्या अटी/शर्ती पुढील प्रमाणे आहेत. सदर ई-लिलाव वाहने नियमानुसार   आदिवासी   भागातील   आदिवासी   सुशिक्षीत बेरोज...

शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी!

Image
  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत ७ जिल्ह्यांतील पात्र लाभार्थ्यांची प्रातिनिधिक स्वरूपातील यादी जाहीर करण्यात आली आहे. #कर्जमुक्तीयोजना #महाराष्ट्रशासन #महाकर्जमुक्ती #शेतकरी #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६