मेरा युवा भारततर्फे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जयंतीनिमित्त स्पर्धा
यवतमाळ, दि.7 (जिमाका) : मेरा युवा भारत,युवा कार्यालय यवतमाळ यांच्या वतीने डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जयंतीनिमित्त ६ जुलै रोजी येथील केमिस्ट भवनातील वानखडे अॅकॅडमीमध्ये वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा युवा अधिकारी सुरज शिंदे यांच्या
मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमाचे नियोजन वानखडे अॅकॅडमीचे संचालक जगदीश वानखडे
यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून मेरा युवा भारतचे अनिल ढेंगे उपस्थित होते. त्यांनी
युवकांना मार्गदर्शन करून विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
स्पर्धेत जिल्ह्यातील ग्रामीण भागासह अनेक
युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध विषयांवर प्रभावी मते मांडली. विजेत्या स्पर्धकांचा
प्रमाणपत्र व पदक देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित युवकांना 'माय भारत' पोर्टलवर
नोंदणीचे महत्त्व सांगण्यात आले. पोर्टलवर नोंदणी करून विविध शासकीय उपक्रम, प्रशिक्षण
व संधींचा लाभ घेण्याचे आवाहनही करण्यात आले.

Comments
Post a Comment