जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

आदेशजारी यवतमाळ, दि. 12 (जिमाका) : सन २०२६ या वर्षासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यवतमाळ जिल्ह्यात तीन स्थानिक सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. राजनैतिक सेवा विभागाच्या शासन निर्णयानुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून या सुट्ट्यांबाबतचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. घोषित करण्यात आलेल्या आदेशानुसार शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी रक्षाबंधन, शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२६ रोजी जेष्ठागौरी पूजन आणि सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी लक्ष्मीपूजन (दुसरा दिवस) या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या सुट्ट्या यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना लागू राहतील. मात्र जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये तसेच अधिकोष यांना हा आदेश लागू राहणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित