शिव महापुराणनिमित्त ३० मार्च रोजी आर्णी येथील आठवडी बाजार बंद

यवतमाळ, दि. 27 (जिमाका) : बहिरमदेव शिव महापुराण सेवा ट्रस्ट, आर्णी यांच्या वतीने दि. ३० मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत पंडित प्रदीप मिश्रा (सिहोर वाले) यांची शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. या धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आर्णी येथे दि. ३० मार्च २०२६ रोजी भरविण्यात येणारा आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी मार्केट अॅड फेअर अॅक्ट, १८६२ अंतर्गत कलम ५ (अ) नुसार हा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार नगरपरिषद आर्णी येथे सोमवार, दि. ३० मार्च २०२६ रोजी भरविण्यात येणारा आठवडी बाजार बंद राहील.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित