शासकीय तंत्रनिकेतन येथे राज्यस्तरीय प्रकल्प प्रतियोगिताचे आयोजन

यवतमाळ,दि.१७ (जिमाका) : तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य मंडळाद्वारे आयोजित राज्यस्तरीय प्रकल्प प्रतियोगिता २०२५-२६ चे आयोजन शासकीय तंत्रनिकेतन, धामणगाव रोड, यवतमाळ येथे दि. १८ मार्च २०२६ रोजी करण्यात आले आहे. या प्रतियोगितेचे उद्घाटन सकाळी १० वाजता सर विश्वेश्वरया ऑडिटोरियम येथे होणार आहे. उद्घाटन समारंभात अमरावती विभागीय कार्यालयाच्या प्र. सहसंचालक डॉ. वि. आर. मानकर, अतिथी म्हणून आरबीटीई, नागपूरचे सहायक सचिव डी. एच. लिल्हारे उपस्थित राहणार आहेत. या प्रतियोगितेमध्ये नागपूर व अमरावती विभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या विविध तंत्रनिकेतन मधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. सर्व शालेय वर्ग ८,९,१० वीच्या विद्यार्थ्यांनी या प्रोजेक्ट प्रतियोगितेला सकाळी ११ ते ४ दरम्यान भेट द्यावी,असे आवाहन यवतमाळच्या शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित