महिला शेतकरी गटांना गावस्तरावर कृषी अवजारे बँक स्थापनेची संधी

कृषि यांत्रिकीकरणाला चालना ; ५ एप्रिलपर्यंत अर्जाची मुदत यवतमाळ, दि. 17 (जिमाका) : जागतिक बँकेच्या सहाय्याने राज्यात राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत गावस्तरावर कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी महिला शेतकरी गटांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी यवतमाळ उपविभगातील पात्र गटांनी 5 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी जे.आर. राठोड यांनी केले आहे. या प्रकल्पांतर्गत ‘एक गाव, एक कृषि अवजारे बँक’ या तत्वानुसार प्रकल्प गावातील नोंदणीकृत महिला शेतकरी गटांमार्फत गावस्तरावरील कृषि अवजारे बँक स्थापन करुन भाडेतत्वावर यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रकल्प गावातील उमेद व माविम पुरस्कृत महिला बचत गट तसेच महिला गाव संघ पात्र राहणार आहेत. कृषि यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी गावस्तरावरील नोंदणीकृत महिला बचत गटांना एफपीओ-डिबीटीच्या https://dbt-ndksp.mahapocra.gov.in/ या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. याबाबत अधिक माहितीसाठी एफपीओ-डिबीटी पोर्टलला भेट द्यावी. यवतमाळ उपविभगांतर्गत 126 गावांची नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत निवड झालेली आहे. यात यवतमाळ तालुक्यात 28, कळंब तालुक्यात 30, राळेगाव तालुक्यात 39 आणि घाटंजी तालुक्यात 29 अशा एकूण 126 गावांची निवड झाली असून गावस्तरावरील कृषि अवजारे बँक या घटकासाठी प्रकल्पाच्या एफपीओ-डिबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या घटकासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम दि. 5 एप्रिलपर्यंत असून एका गावातून एकापेक्षा जास्त गटांचे अर्ज प्राप्त झाल्यास, अर्जाची निवड प्रक्रिया ऑनलाईन लॉटरी पध्दतीने करण्यात येईल, असे आवाहन आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी जे.आर. राठोड यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती