गॅस पुरवठ्यातील अडचणींसाठी तालुकानिहाय संपर्क अधिकारी नियुक्त

नागरिकांना संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे पत्रक जारी यवतमाळ, दि.15 : मध्यपूर्व आशिया, अमेरिका व युरोपियन खंडात सध्या सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. गॅस पुरवठ्यासंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी तालुकानिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे संपर्क क्रमांक जारी करण्यात आले आहे. याबाबतचे पत्रक जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी जारी केले आहे. तसेच नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या सुचनांचे पालन करुन सहकार्य करावे व गॅस एजन्सीवर अनावश्यक गर्दी किंवा गोंधळ टाळावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. गॅस पुरवठ्यासंदर्भात काही अडचणी उद्भवल्यास नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी तालुकानिहाय संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यानुसार यवतमाळ तालुक्यासाठी मिथुन ठाकरे 9763050795 व सीमा दोंदल 8459142150, दारव्हा तालुक्यासाठी सत्यवान बांते 8806863394 व तुषार राठोड 9767254228, दिग्रस सत्यवान बांते 8806863394 व अतिफ हक 9604476734, वणी विवेक पांडे 9823449044, श्विशाल कांबळे 8104968576, आर्णी जीवन राठोड 9096661506, बाबुळगाव मंगेश गाढवे 989095099, घाटंजी किरण मस्के 9405163924, कळंब संध्या मनवर 9689722625, केळापूर कांचन कामडे 9765907892, महागाव मोहन कोल्हे 7678822670, मारेगाव विजय मत्ते 8605752141, नेर पूनम खांडेकर 9322014314, पुसद अमोल महाजन 9096860487, राळेगाव चंद्रकांत पाटील 9730632566, उमरखेड अमोल महाजन 9096860487, झरी जामणी नम्रता पारतकर 7722080847 यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी शांतता व संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच कोणतीही अफवा पसरवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित