अधिकारी, कर्मचाऱ्यांना डिजिटल जनगणनेचे प्रशिक्षण

२३ ते २५ मार्च दरम्यान प्रशिक्षण कार्यक्रम यवतमाळ, दि. २३ (जिमाका) : जिल्हा प्रशासनाच्या वतीने जनगणना प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना डिजिटल जनगणनेचे प्रशिक्षण देण्यासाठी तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या प्रशिक्षणाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, प्रशिक्षक म्हणून जनगणना संचालनालयाचे सह संचालक व्हि. एस दिक्षीत, सांख्यिकीचे मयुर पवार उपस्थित होते. या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात पहिल्या टप्प्यातील डिजिटल घरगणनासंदर्भात जिल्हास्तरावरील सर्व अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित