घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या वापर करणाऱ्यांवर धाड

दारव्ह्यात १२ घरगुती गॅस जप्त गोपनीय पथकाची कारवाई ६ गोपनीय पथकांची नेमणूक यवतमाळ : दारव्हा शहर व ग्रामीण भागात घरगुती गॅसचा अवैधरित्या वापर करणाऱ्यावर गोपनीय पथकांने धाड टाकून १२ घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले. सध्यस्थितीत जागतिक युद्ध परिस्थिती विचारात घेता इंधनाबाबत तूटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परीस्थितीमध्ये घरगुती गॅसचा वितरण सुरळीत ठेवण्यासाठी शासन निर्णयान्वये घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्याकरिता गॅस व्यावसायिकांच्या तपासण्या करण्याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुषंगाने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्या करिता तहसिलदार दारव्हा यांचे मार्गदर्शनाखाली ६ गोपनीय पथके नेमून दारव्हा शहरी विभाग व काही ग्रामीण भागामध्ये नायब तहसिलदार एस डब्लू आंबेकर, मंडळ अधिकारी बाळकृष्ण गाढवे, म.अ. जोशी, म.अ. मेश्राम यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी , शिपाई, कोतवाल व पुरवठा विभागातील कर्मचारी असे पथक नेमून एकाच वेळी शहरी व काही ग्रामीण भागामध्ये धाडी टाकून/तपासण्या करून एकूण १२ घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या वापर करीत असल्याचे निदर्शनास आल्याने जप्त करण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरु आहे. नागरिकांनी गॅस सिलेंडरचा अनावश्यक साठा करू नये. गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून घाबरून अतिरिक्त सिलिंडर बुक केल्यास वितरण व्यवस्थेवर ताण येतो, तसेच वितरकांना पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या गॅस एजन्सीला सूचना देण्यात येत आहेत. - पुरवठा निरीक्षक तुषार राठोड घरगुती सिलेंडरचा दारव्हा तालुक्यात पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोणीही व्यावसायिक वापरासाठी घरगुती सिलेंडर वापरू नये - तहसिलदार दारव्हा राजेश पउळ

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती