नाफेडचे पाच चना खरेदी केंद्र सुरु Ø 29 एप्रिलपर्यंत ऑनलाईन नोंदणीचे आवाहन

यवतमाळ, दि. 5 :(जिमाका) : खरीप पणन हंगामांतर्गत आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत चना खरेदीसाठी नाफेडमार्फत जिल्ह्यातील महागाव, पांढरकवडा, पाटण, पुसद व आर्णी या पाच ठिकाणी खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. खरेदी केंद्रांमध्ये तालुका खरेदी विक्री संघ मर्या. महागांव, तालुका खरेदी विक्री संघ मर्या. पांढरकवडा, बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था मर्या.पाटण, पुसद तालुक्यात किसान मार्केट यार्ड शेलु (बु), पुसद व शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी या केंद्रांचा समावेश आहे. जिल्ह्यातील चना खरेदी ही 29 एप्रिलपर्यंत करण्यात येणार असून चना खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड, 7/12 उतारा, पिकपेरा व बॅकेचे पासबुकची झेरॉक्स प्रत ही आवश्यक कागदपत्रे संबंधित खरेदी केंद्रावर स्वत: हजर राहून नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी प्र. विजय गाढवे यांनी केले आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती