शासकीय तंत्रनिकेतन येथे राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धा

यवतमाळ, दि.20 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाद्वारे आयोजित राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धा २०२५-२६ दि. १८ मार्च रोजी शासकीय तंत्रनिकेतन, यवतमाळ येथे यशस्वीरीत्या संपन्न झाली. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख उद्घाटक म्हणून विभागीय कार्यालय, अमरावतीचे प्र. संचालक डॉ. व्ही. आर. मानकर तसेच प्रमुख अतिथी म्हणून आरबीटीई नागपूरचे सहायक सचिव डी. एच. लिल्हारे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धेच्या परीक्षक मंडळात गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज, जळगावचे प्राचार्य डॉ. सुहास एस. गजरे, व्यवस्थापकीय संचालक, ऍपल केमि इंडिया प्रा. लि., नागपूर विवेक नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्लोबल पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, नागपूर संजय निचाट आणि सहयोगी प्राध्यापक व विभागाध्यक्ष, सिव्हिल इंजिनिअरिंग, जी.सी.ओ.ई. नागपूर डॉ. एस. एन. खांते यांचा समावेश होता. स्पर्धेचा प्रथम पुरस्कार एक लाख रुपये डॉ. पी. डी. तंत्रनिकेतन, अमरावती व शासकीय तंत्रनिकेतन, खामगाव यांना विभागून देण्यात आला. तसेच द्वितीय पुरस्कार ५० हजार रुपये शासकीय तंत्रनिकेतन, आर्वी व शासकीय तंत्रनिकेतन, मूर्तिजापूर यांना विभागून देण्यात आला. या स्पर्धेचे आयोजन प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, यवतमाळ ए. पी. मटाले यांच्या संयोजनात करण्यात आले. प्रमुख समन्वयक एस. एस. मेटे, मुख्य समन्वयक डॉ. बी. पी. भगत तसेच सह-समन्वयक एस. व्ही. बहाळे आणि एच. पी. खामकर यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती