हॉटेल, बार-रेस्टॉरंटमध्ये अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडर वापराविरुद्ध धडक कारवाई; १३ सिलेंडर जप्त

यवतमाळ, दि.१८ (जिमाका) : जिल्ह्यातील हॉटेल, भोजनालय तसेच बार-रेस्टॉरंटमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या वापर करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून भरारी पथकांकडून धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईत महागांव, हिवरा, धनोडा, गुंज आदी ठिकाणांसह विविध हॉटेल व रेस्टॉरंटमधून एकूण १३ भरलेले घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. ही कारवाई जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या निर्देशानुसार आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकातील परिवक्षाधीन तहसीलदार रोहित शिंदे, पुरवठा निरीक्षण अधिकारी मोहन कोल्हे, नायब तहसीलदार व्ही. व्ही. पवार, गोदाम व्यवस्थापक राम बनसोडे तसेच लिपिक लखन चव्हान यांनी ही कारवाई केली.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती