उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकांना मिळणार शासनाचा ‘युवा पुरस्कार’!

िल्हास्तरीय पुरस्कारासाठी 10 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन नोंदणीकृत संस्थांही पात्र यवतमाळ, दि. 11 (जिमाका) : राज्य शासनाच्या युवक धोरणाअंतर्गत युवक व युवतींनी विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरण, क्रीडा, आरोग्य, विज्ञान-तंत्रज्ञान तसेच समाजविकास क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी जिल्हास्तर व राज्यस्तर युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सन २०२४-२५ या वर्षासाठी जिल्हास्तर युवा पुरस्काराकरिता पात्र युवक, युवती तसेच नोंदणीकृत संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पुरस्काराचे स्वरुप : या पुरस्कारांतर्गत जिल्हास्तरावर एक युवक, एक युवती व एक नोंदणीकृत संस्थेला गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. त्यामध्ये युवक व युवतींना प्रत्येकी १० हजार रुपये तर संस्थेला ५० हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येईल. पात्रता काय ? अर्जदार युवक किंवा युवतीचे वय पुरस्कार वर्षातील १ एप्रिल २०२४ रोजी किमान १३ वर्षे पूर्ण व ३१ मार्च २०२५ रोजी कमाल ३५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच जिल्हास्तर पुरस्कारासाठी अर्जदाराचे संबंधित जिल्ह्यात किमान पाच वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे. कागदपत्रे कोणती ? अर्जदाराने समाजोपयोगी क्षेत्रात केलेल्या कार्याचे पुरावे त्यात वृत्तपत्र कात्रणे, प्रमाणपत्रे, छायाचित्रे आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. संस्थांसाठी संबंधित संस्था कायदेशीररित्या नोंदणीकृत असणे व किमान पाच वर्षे कार्यरत असणे आवश्यक आहे. संस्थेने केलेल्या कार्याचे पुरावे अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील. ‘या’ तारखेपर्यंत मुदत इच्छुक पात्र युवक, युवती व नोंदणीकृत संस्थांनी १० एप्रिल २०२६ पूर्वी कार्यालयीन वेळेत आपले अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू स्टेडियम, गोधन रोड, यवतमाळ येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि. १२ नोव्हेंबर २०१३ च्या शासन निर्णयानुसार उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार यांनी केले आहे

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती