उद्यापासून भव्य ‘यवतमाळ महोत्सव’ला प्रारंभ !
कृषी महोत्सव, पशु प्रदर्शन, समृद्धी सरस प्रदर्शन, सांस्कृतिक महोत्सव, नव तेजस्विनी प्रदर्शन, शासकीय योजनांचे प्रदर्शन, ग्रंथोत्सवाचे आयोजन
विविध कार्यक्रमांची रेलचेल
27 ते 31 मार्च या कालावधीत आयोजन
नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाह
यवतमाळ दि.25 (जिमाका) : राज्य शासनाच्या विविध विभागांच्या जिल्हास्तरीय कार्यलयांच्या संयुक्त विद्यामाने शुक्रवारी दि. 27 मार्च ते 31 मार्च या कालावधीत कृषी विज्ञान केंद्र प्रक्षेत्र (वाघापूर) येथे भव्य ‘यवतमाळ महोत्सव 2026’ चे आयोजन करण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होवून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पत्रकार परिषदेत केले.
कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठ, अकोला, उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय आणि नगर परिषद, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन 27 मार्च रोजी पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या यवतमाळ महोत्सवात कृषि महोत्सव, पशु प्रदर्शन, समृद्धी सरस प्रदर्शन, सांस्कृतिक महोत्सव, नव तेजस्विनी प्रदर्शन, शासकीय योजनांच्या माहितीचे प्रदर्शन, ग्रंथोत्सवाचा समावेश आहे.
या उद्घाटनीय कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री ना.प्रा.डॉ.अशोक उईके, राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच खा.संजय देशमुख, खा. प्रतिभा धानोरकर, खा. नागेश पाटील आष्टिकर, आ. भावना गवळी, आ. अॅड. किरण सरनाईक, आ. धीरज लिंगाडे, आ. राजु तोडसाम, आ. अनिल उर्फ बाळासाहेब मांगुळकर, आ.संजय देरकर, आ. किसन वानखेडे, यवतमाळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अॅड. प्रियदर्शनी उईके, उपनगराध्यक्ष विलास कुळकर्णी, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांच्यासह विविध विभागांचे अमरावती विभागीय अधिकारी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
या यवतमाळ महोत्सवात कृषि विभागाला 200 स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत.याकरिता एकूण 8 डोमची उभारणी करण्यात येणार आहे. या डोममध्ये शासकिय दालने, परिसंवाद, चर्चासत्रे व विविध स्पर्धांसाठी सेमिनार हॉल, कृषि निविष्ठा दालने, महिला बचत गटांच्या फुड झोन, खाद्यपदार्थ, गृहपयोगी वस्तू आणि माविम बचत गट व सेंद्रीय शेती / धान्य विक्री, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग आणि उमेदच्या जिल्हा ग्रामिण विकास यंत्रनांचे दालन, यासह सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी डोम, शासकीय योजनांच्या माहितीचे प्रदर्शन दालन, जिल्हा ग्रंथालय कार्यालयाचे ग्रंथोत्सव दालन असणार आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांनी या यवतमाळ महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले.
या पत्रकार परिषदेनंतर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन तयारीची माहिती घेतली व यवतमाळ महोत्सव यशस्वी करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.









Comments
Post a Comment